मेयो, मेडिकलमध्ये केवळ इर्मजन्सी रुग्णसेवा; १५०वर शस्त्रक्रियांना फटका

By सुमेध वाघमार | Published: March 14, 2023 04:47 PM2023-03-14T16:47:02+5:302023-03-14T16:47:40+5:30

औषधी वितरण, रक्त तपासण्या, सफाईची कामे खोळंबली 

employees on strike for old pension scheme, Emergency care only at Mayo, Medical; Surgeries hit at 150 | मेयो, मेडिकलमध्ये केवळ इर्मजन्सी रुग्णसेवा; १५०वर शस्त्रक्रियांना फटका

मेयो, मेडिकलमध्ये केवळ इर्मजन्सी रुग्णसेवा; १५०वर शस्त्रक्रियांना फटका

googlenewsNext

नागपूर : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मेयो, मेडिकलसह डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय व कामगार विमा रुग्णालयातील परिचारिका, तंत्रज्ञ, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी मंगळवारी संपावर गेल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली. जवळपास १५०वर नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याने रुग्णांना मोठा फटका बसला. रुग्णांच्या तुलनेत मोजक्याच परिचारिका व कर्मचारी असल्याने केवळ इर्मजन्सी रुग्णसेवा देण्यात आली. 

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास परिचारिकांसह कर्मचाºयांनी एकत्र मोर्चा काढला. अधिष्ठाता कार्यालयासमोर व बाह्यरुग्ण विभागासमोर मोर्चेकरांनी जोरदार नारेबाजी करीत रुग्णालयाचा परिसर दणाणून सोडला.

संपावर पर्याय म्हणून मेयो, मेडिकल, डागा व प्रादेशिक मनोरुग्णालयाने नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी, ‘पब्लिक हेल्थ नर्स’, कंत्राटी कर्मचाºयांवर रुग्णालयाची जबाबदारी टाकली. परंतु रुग्णसंख्येच्या तुलनेत यांची संख्या कमी पडल्याने व अनुभवाच्या कमतरतेमुळे रुग्णसेवा प्रभावित झाल्याचे दिसून आले.

Web Title: employees on strike for old pension scheme, Emergency care only at Mayo, Medical; Surgeries hit at 150

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.