नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:10 AM2021-09-24T04:10:12+5:302021-09-24T04:10:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : नाेंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने राज्य शासनाने त्यांच्या प्रलंबित मागण्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : नाेंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेने राज्य शासनाने त्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली असून, यासाठी त्यांनी मंगळवार (दि. २१)पासून बेमुदत संप पुकारला आहे. यात काटाेल येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या या आंदाेलनामुळे कार्यालयीन काम ठप्प झाले आहे.
पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू करू नये, या विभागातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरावी, मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांची पदे विभागातील पदोन्नतीने भरावी, कोरोनाने मृत्यू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने ५० लाख रुपयांची मदत करावी, मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्यावी, तुकडेबंदी रेरा (रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲण्ड डेव्हलपमेंट ॲक्ट) कायद्यान्वये नोंदणी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई मागे घ्यावी, सह. दुय्यम निबंधक वर्ग-२ व दुय्यम निबंधक श्रेणी-१ संवर्गाचे एकत्रीकरण करावे, पदनामात बदल करावे, खात्याची विभागीय परीक्षा प्रत्येक वर्षी घ्यावी, विभागीय चौकशीची कार्यवाही मुदतीत पूर्ण करावी, बदल्या करताना संघटनेस विचारात घ्यावे, आदी मागण्यांसाठी आंदाेलन केले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाचा गुरुवारी (दि. २३) तिसरा दिवस हाेता. काटाेल शहरातील दुुय्यम निबंधक कार्यालय सलग तीन दिवस कार्यालय बंद असल्याने नागरिकांना अडचणींना ताेंड द्यावे लागत आहे. हा संप राज्यव्यापी असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.