बँक-विमा कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील कर्मचारी आज संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 01:32 AM2019-01-08T01:32:50+5:302019-01-08T01:39:27+5:30

कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशभरातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून दोन दिवसीय संप पुकारला आहे. या संपात बँक, विमा, पोस्ट ऑफीससह देशभरातील विविध क्षेत्रातील कर्मचारी व कामगार सहभागी होणार आहेत. दरम्यान स्पीड पोस्ट कर्मचारी आज सोमवारी मध्यरात्रीपासूनच संपावर गेले आहेत. संपकऱ्यांची मंगळवारी दुपारी संविधान चौकात सभा होईल.

Employees from various sectors including bank-insurance employees today strike | बँक-विमा कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील कर्मचारी आज संपावर

बँक-विमा कर्मचाऱ्यांसह विविध क्षेत्रातील कर्मचारी आज संपावर

googlenewsNext
ठळक मुद्देसंपकऱ्यांची संविधान चौकात सभास्पीड पोस्ट कर्मचारी मध्यरात्रीपासूनच संपावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ देशभरातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून दोन दिवसीय संप पुकारला आहे. या संपात बँक, विमा, पोस्ट ऑफीससह देशभरातील विविध क्षेत्रातील कर्मचारी व कामगार सहभागी होणार आहेत. दरम्यान स्पीड पोस्ट कर्मचारी आज सोमवारी मध्यरात्रीपासूनच संपावर गेले आहेत. संपकऱ्यांची मंगळवारी दुपारी संविधान चौकात सभा होईल.
सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खासगीकरण, कंत्राटी पद्धत, आऊटसोर्सिंग, रोजंदारी पद्धतीचा सर्रास वापर होत असल्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. यात बँकिंग उद्योगातील ऑल इंडिया एम्प्लॉईज असोसिएशन तसेच बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया, तर विमा उद्योगातील ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशन व ऑल इंडिया एलआयसी एम्प्लॉईज फेडरेशन या संघटना सहभागी होत आहे. याअंतर्गत सर्व राष्ट्रीयीकृत व जुन्या खासगी बँकेचे कर्मचारीही संपात सहभागी होत आहेत.
मंगळवारी सकाळी ११ वाजता किंग्जवे श्रीमोहिनी कॉम्प्लॅक्स येथील बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयातून कर्मचारी रॅली काढतील. ही रॅली संविधान चौकात येईल. येथे संपकऱ्यांची संयुक्त सभा होईल.

भारतीय मजदूर संघ संपात नाही
भारतीय मजदूर संघाने या दोन दिवसीय संपात सहभागी नसल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय पक्षांशी जुळलेल्या संघटनांनी हा संप पुकारला आहे. त्यामुळे आम्ही या संपात नाही. ज्या मागण्या होत्या त्यातील बहुतेक मागण्या सरकारने मान्य केल्या असून, उर्वरित मागण्यांबाबत सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
संपात ऑटोचालकांचाही सहभाग
केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने ८ व ९ जानेवारीला होणाऱ्या देशव्यापी संपाला तीन सीटर ऑटोरिक्षा चालक संयुक्त संघर्ष समितीने समर्थन दिले आहे. संपाच्या पहिल्या दिवशी नागपुरातील समितीचे सर्व ऑटोरिक्षा आपला व्यवसाय बंद ठेवणार आहे. यामुळे शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता आहे.
समितीचे हरिश्चंद्र पवार यांनी सांगितले, शासन ऑटोचालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. म्हणूनच मंगळवारपासून होणाऱ्या दोन दिवसीय देशव्यापी संपात ऑटोरिक्षा चालकांनी समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. या संपातून समाजकल्याण बोर्ड स्थापन करण्याच्या मागणीसह इतरही मागण्या रेटून धरण्यात येणार आहेत. मंगळवारी दुपारी १२ वाजता सिव्हिल लाईन्स येथील संविधान चौकात ऑटो चालक धरणे देणार आहेत, असेही ते म्हणाले.
पालकांना दिली संपाची माहिती
ऑटोरिक्षामधून वाहतूक करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मंगळवारी संपावर जात असल्याची माहिती ऑटोचालकांनी सोमवारी विद्यार्थ्यांच्या पालकांना दिली. यामुळे पालकांवर विद्यार्थ्यांना ने-आण करण्याची जबाबदारी येणार आहे. काही पालकांनी शाळा- महाविद्यालयांना संपाचे कारण देत विद्यार्थ्याला सुटी देण्याची विनंती केल्याचे समजते.

Web Title: Employees from various sectors including bank-insurance employees today strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.