शेतकऱ्यापर्यंत योजना पोचविण्यासाठी शेतीदूतांची नेमणूक करा : नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 04:06 PM2017-12-19T16:06:08+5:302017-12-19T16:10:10+5:30

शेतीदूत नेमण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना, शेतकऱ्यांना वादळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाईची मागणी

Employers should be appointed for the scheme to the farmer: Neelam Gorhe | शेतकऱ्यापर्यंत योजना पोचविण्यासाठी शेतीदूतांची नेमणूक करा : नीलम गोऱ्हे 

शेतकऱ्यापर्यंत योजना पोचविण्यासाठी शेतीदूतांची नेमणूक करा : नीलम गोऱ्हे 

Next

नागपूर : ‘राज्यात शेतकऱ्यांचा खरा विकास व्हायचा असेल तर राज्यात तालुकानिहाय शेतीदूतांची नेमणूक  करण्यात यावी. यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास मदत होईल. मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाकडून त्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे. राज्यात गेल्या पाच महिन्यात १२५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तसेच विषारी औषध फवारणीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपले जीव गमवावे लागणे. ही अतिशय दुख: दायक गोष्ट आहे,’ असे शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या विधानपरिषद प्रतोद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिपादन आज सभागृहात केले.

हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या प्रस्तावात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ‘शेतीजमिनीची सुधारणा करण्याची अत्यंत आवश्यकता असून शेतीतील उत्पादकता वाढायला हवी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. शेतीमध्ये तयार होणाऱ्या मालाला योग्य ते संरक्षण मिळावे याकरिता कृषी विमा निधी (Agricultural Risk Fund),ग्रामीण विमा विकास निधी (Rural Insurance Development fund), मानवी विमा योजना (Human Health Insurance package), किमान आधारभूत किंमत  Minimum support Price या संकल्पना प्रत्यक्षात येण्याची अत्याधिक गरज असल्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. यावर नियंत्रण राहिले नाही तर साठेबाजांचे फावते हे आपण पाहिले आहे. शेतकरी आयोग व कृषीमुल्य आयोगाने अधिकाधिक प्रभावीपणे काम करावे अशी अपेक्षा आज सर्वत्र व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी सरकारला शेतकरी आणि शिवसेनेच्या दबावामुळे करावीच लागली. मात्र ही योजना राबवताना ऑनलाईनच्या घोळात आणि किती शेतकऱ्यांनी अर्ज केले व किती नाही याची शहानिशा करण्यात अधिक वेळ गेला. आता मात्र या योजनेंतर्गत किती  शेतकऱ्यांना खरोखरीच लाभ मिळाला आहे याबाबतच्या जिल्हानिहाय यादीची मागणी महसूल विभागाकडे सभागृहाच्या समोर मी करीत आहे. महसूल यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. विदर्भ विकासाचा अहवाल सभागृहासमोर सादर करण्यात यावा. ’

१९ मे २०१७ रोजी नाशिक येथे शेतकरी संघटना, शेतकरी नेते खा. राजू शेट्टी यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची बैठक झाली होती. यानंतर १ जून ला ग्रामसभेचा ठराव झाला आणि शेतकरी संप जाहीर झाला.  ५ जून २०१७ रोजी सुकाणू समितीची स्थापना करून सरकारने १८ जून २०१७ ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अस्तित्वात आली. ज्या ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यासाठी रक्त सांडावे लागले त्यांना मनपूर्वक अभिवादन करते. शिवजलक्रांती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ही एक समाधानाची बाब आहे. बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. पण राज्यात घडलेल्या शीतल वायाळ सारख्या मुलींच्या आत्महत्या, हुंडाबळीच्या अनेक केसेस या अजूनही वेदनादायकच आहेत. किशोरी व किशोर यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे यावर शासनाने काम करावे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याच्या त्यांची सूचना अंमलात आणल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हार्दिक आभार मानले आहेत

Web Title: Employers should be appointed for the scheme to the farmer: Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.