आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणानंतर स्थानिकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:51+5:302021-06-05T04:07:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कौशल्य विकास प्रशिक्षणाशी निगडित पॅरामेडिकल क्षेत्रातील मनुष्यबळ तयार करण्यासाठी हेल्थकेअर सेक्टर स्किल कौन्सिल ...

Employment of locals after training in health sector | आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणानंतर स्थानिकांना रोजगार

आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षणानंतर स्थानिकांना रोजगार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कौशल्य विकास प्रशिक्षणाशी निगडित पॅरामेडिकल क्षेत्रातील मनुष्यबळ तयार करण्यासाठी हेल्थकेअर सेक्टर स्किल कौन्सिल मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींना रुग्णालयात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या रुग्णालयात नोकरी देण्यात येईल. त्यामुळे रुग्णालयांना कुशल मनुष्यबळही उपलब्ध होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे.

रुग्णालयातील पायाभूत सुविधांचा वापर करून प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) देण्यात येणार आहे. प्रशिक्षण संस्थांना राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रशिक्षण शुल्क देण्यात येईल. या योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये कुशल मनुष्यबळ तयार करण्याचा उद्देश आहे. जिल्ह्यात युवक-युवतींना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. ग. हरडे यांनी दिली.

बॉक्स

या कोर्सचे प्रशिक्षण

वैद्यकीय तंत्रज्ञ, ड्रेसर, पंचकर्म तंत्रज्ञ, आयुर्वेद डाएटिशियन, योगा थेरपी सहायक, मेडिकल रेकॉर्ड सहायक, ड्यूटी मॅनेजर, डायबिटीज असिस्टंट, ट्रान्स्प्लांट को-ऑर्डिनेटर, रुग्णवाहिका चालक, ज्येष्ठ नागरिकांसाठी केअर टेकर, वैद्यकीय साहित्य तंत्रज्ञ, योगा वेलनेस ट्रेनर, आयुर्वेद आहार आणि पोषण सहायक, इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन यांसह ३६ कोर्सेस. शैक्षणिक पात्रता - किमान दहावी उत्तीर्ण ते पदवीधारक.

Web Title: Employment of locals after training in health sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.