मेट्रो रेल्वेचा वापर करण्यासाठी देणार कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:13 AM2020-11-28T04:13:42+5:302020-11-28T04:13:42+5:30
एमआयडीसी बुटीबोरी असोसिएशनचा पुढाकार : प्रत्येक महिन्याचा एक दिवस ग्रीन डे नागपूर : नागरिकांनी जास्तीत जास्त मेट्रो रेल्वेचा वापर ...
एमआयडीसी बुटीबोरी असोसिएशनचा पुढाकार : प्रत्येक महिन्याचा एक दिवस ग्रीन डे
नागपूर : नागरिकांनी जास्तीत जास्त मेट्रो रेल्वेचा वापर करावा यासाठी महामेट्रोने नवी योजना आखून त्याची अंमलबजावणी सुरू केली असून त्यास प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महामेट्रोने एमआयडीसी बुटीबोरी असोसिएशन येथे मेट्रो संवादचे आयोजन केले. यात १०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून महामेट्रोचा वापर करण्याचा मनोदय व्यक्त केला.
महामेट्रोने नुकतीच खापरी मेट्रो स्टेशन येथून बुटीबोरी आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन येथून हिंगणा व जवळपासच्या परिसरात जाण्यासाठी फिडर सर्व्हिसच्या रूपाने आपली बसची सेवा सुरू केली आहे. यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असून त्यांचा प्रवास सुखकर झाला आहे. बुटीबोरी एमआयडीसी या ठिकाणी शहरातून हजारो प्रवासी आपल्या दुचाकीने प्रवास करतात. महामेट्रोने या प्रवाशांसाठी मेट्रो आणि फिडर सर्व्हिस उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार आता धावत्या मेट्रोमध्ये सायकल घेऊन प्रवास करणे शक्य झाले आहे. मेट्रो संवादमध्ये एमआयडीसी बुटीबोरी असोसिएशनच्या सभासदांना परिवहन, मल्टिमॉडेल इंटिग्रेशन बाबत सादरीकरण करण्यात आले. तसेच महा कार्ड संबंधी माहिती देण्यात आली. संवादादरम्यान असोसिएशनच्या सभासदांना फिडर सर्व्हिसचा वापर करण्याचे तसेच महिन्याचा एक दिवस ग्रीन डे म्हणून साजरा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी मेट्रोचा वापर करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
.....................