नागपूरच्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार शेतकऱ्यांना प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:06 PM2018-01-23T23:06:02+5:302018-01-23T23:09:14+5:30

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व शेतमालाला योग्य बाजारभाव उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात ‘आत्मा’ च्या माध्यमातून २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सव होणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवात शेतीशी निगडित विविध विषयांवर परिसंवाद आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान देखील होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पत्रपरिषदेत दिली.

Encourage the farmers to get through the Agri Mahotsav of Nagpur | नागपूरच्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार शेतकऱ्यांना प्रोत्साहन

नागपूरच्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार शेतकऱ्यांना प्रोत्साहन

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी सचिन कुर्वे : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व शेतमालाला योग्य बाजारभाव उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात ‘आत्मा’ च्या माध्यमातून २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सव होणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवात शेतीशी निगडित विविध विषयांवर परिसंवाद आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान देखील होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पत्रपरिषदेत दिली.
कृषी महोत्सवात कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकºयांना मिळणार आहे. समूह, गट संघटित करून शेतकरी आणि उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव व ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृंखला विकसित करण्यात येणार आहे. कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणद्वारे शेतकºयांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देण्यात येणार आहे. महोत्सवात २०० स्टॉल राहणार आहे. यात शेतकऱ्यांना नि:शुल्क स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवाला किमान दहा हजार लोक भेटी देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पत्रपरिषदेला आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.नलिनी भोयर व प्रकल्प उपसंचालक ए. एम. कुसळकर उपस्थित होते.
 नॉफ्प्स नावाने सेंद्रीय शेतकऱ्यांचे ब्रॅण्डिंग
विषमुक्त अन्न काळाजी गरज झाली आहे. जिल्ह्यातील ३२ शेतकऱ्यांचे गट सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन करीत आहे. या शेतमालाला चांगला भाव मिळावा व ग्राहकांना सुद्धा सेंद्रीय शेतमाल खरेदी केल्याची हमी मिळावी या दृष्टीने सेंद्रीय शेतमालाच्या उत्पादनाचा नागपूर ब्रॅण्ड तयार करण्यात आला आहे. नागपूर आॅर्गेनिक फार्म प्रोड्युस सिस्टीम नावाने हा ब्रॅण्डचे महोत्सवात लाँचिंग होणार आहे.

Web Title: Encourage the farmers to get through the Agri Mahotsav of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.