अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:31+5:302021-06-22T04:07:31+5:30

यावेळी तालुका कृषी अधिकारी नाकाडे, मंडळ कृषी अधिकारी इनामदार प्रामुख्याने उपस्थित होते. सोयाबीन पिकाची बीबीएफ किंवा पट्टा पद्धतीने लागवडीबाबत ...

Encourage farmers to use the latest technology | अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

Next

यावेळी तालुका कृषी अधिकारी नाकाडे, मंडळ कृषी अधिकारी इनामदार प्रामुख्याने उपस्थित होते. सोयाबीन पिकाची बीबीएफ किंवा पट्टा पद्धतीने लागवडीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. भिवापूर तालुक्यातील बोर्डकला येथेही या सप्ताहाअंतर्गत झालेल्या कार्यक्रमात तालुका कृषी आधिकारी जारोंडे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हा सप्ताह राबविण्यात येत असून विविध उपक्रमाेचे आयोजन केले आहे. कृषी दिनी समारोप होणार आहे.

या सप्ताहाअंतर्गत २२ जूनला बीज प्रक्रिया, २३ जूनला जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, २४ जूनला कापूस-एक गाव एक वाण, भात क्षेत्रात सुधारित भात लागवड, कडधान्य क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान, २५ जूनला विकेल ते पिकेल, २८ जूनला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, २९ जूनला तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, ३० जूनला जिल्ह्यातील महत्त्वांच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना या कार्यक्रमाचे आयोजन करून १ जुलैला कृषी दिन साजरा करून या मोहिमेचा समारोप होणार आहे. या मोहिमेदरम्यान कृषी विभागाच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती ब्लॉग स्पॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अपेक्षा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Encourage farmers to use the latest technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.