नवीन औद्योगिक धोरणात सेवा उद्योगाला प्रोत्साहन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 11:38 PM2018-07-31T23:38:54+5:302018-07-31T23:41:00+5:30
चेंबर आॅफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनने (कोसिया) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना राज्य शासनातर्फे लवकर दाखल करण्यात येणाऱ्या नवीन औद्योगिक धोरणासंदर्भात १५ सूचनांचे निवेदन ‘कोसिया’च्या विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष मयंक शुक्ला आणि कोर कमिटी सदस्य सीए जुल्फेश शाह यांच्या नेतृत्वात दिले. प्रतिनिधी मंडळात कोसियाचे सुनील जेजानी आणि विपुल पंचमतिया उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चेंबर आॅफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनने (कोसिया) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना राज्य शासनातर्फे लवकर दाखल करण्यात येणाऱ्या नवीन औद्योगिक धोरणासंदर्भात १५ सूचनांचे निवेदन ‘कोसिया’च्या विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष मयंक शुक्ला आणि कोर कमिटी सदस्य सीए जुल्फेश शाह यांच्या नेतृत्वात दिले. प्रतिनिधी मंडळात कोसियाचे सुनील जेजानी आणि विपुल पंचमतिया उपस्थित होते.
कोसियातर्फे सोपविलेल्या निवेदनात सेवा इंडस्ट्रीजला नवीन औद्योगिक धोरणात प्रोत्साहन देण्याची मागणी केली. जीएसटी लागू होण्यापूर्वी सेवाकर केंद्र सरकारला मिळत होता. यामध्ये राज्य सरकारची थेट कुठलीही भागीदारी नव्हती. परंतु जीएसटी लागू झाल्यानंतर राज्य शासनाला त्यातील वाटा मिळू लागला. नॉन-व्हॅट अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीजला जसे राईस मिल, दाल मिल आदी विदर्भातील मागास क्षेत्र भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगाच्या माध्यमातून मुख्यत्वे स्थानिक आणि कमी कुशल लोकांना रोजगार मिळाला आहे. या युनिटला कोणतेही विशेष प्रोत्साहन मिळत नाही. निवेदनात सोलर पॉवरचा उपयोग करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे.
कोसिया पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या उद्योगांना रोजगार प्रदान करण्यासंदर्भात स्वतंत्ररीत्या कोणतेही प्रोत्साहन मिळत नाही आणि असे धोरणही नाही. जीएसटी प्रणाली लागू झाल्यानंतर सुधारणा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.