विरोधानंतरही हटविले खलासी लाईनचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:08 AM2021-01-15T04:08:18+5:302021-01-15T04:08:18+5:30

नागपूर : मोहन नगरातील खलासी लाईन येथे असलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला बुधवारी नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. अवैध अतिक्रमण ...

Encroachment of sailors line deleted even after protest | विरोधानंतरही हटविले खलासी लाईनचे अतिक्रमण

विरोधानंतरही हटविले खलासी लाईनचे अतिक्रमण

Next

नागपूर : मोहन नगरातील खलासी लाईन येथे असलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला बुधवारी नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी पोहचलेल्या पथकाच्या विरोधात १५० ते २०० नागरिक सरसावले. अखेर अधिकची पोलीस कुमक मागवून पथकाला ही कारवाई पूर्ण करावी लागली.

येथे असलेल्या जुन्या शौचालयांना पाडून मनपाने काही दिवसांपूर्वी जागा मोकळी केली होती. मात्र एनिगेल अरुण गुल्हाने याच्या मार्फत सुनील जेकब यांनी टिनाचे घर अवैधपणे उभारणे सुरू केले होते. मनपाच्या माहितीनुसार, हे अतिक्रमण हटविण्यासाठी अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन २४ तासातअतिक्रमण हटविण्यास सांगितले होते. मात्र अतिक्रमण न हटविल्याने मंगळवारी झोनचे अधिकारी आणि अतिक्रमण हटावो पथकातील अधिकारी बुधवारी सकाळी जेसीबी घेऊन पोहचले. मात्र ८ ते १० नागरिकांनी जेसीबीसमोर येऊन विरोध सुरू केला. पहाता पहाता वस्तीमधील १५० ते २०० नागरिक गोळा झाले. त्यांनी कारवाईचे समर्थन करून पथकाच्या बाजूने घोषणाबाजी सुरू केली. यामुळे परिसरात बराच गोंधळ माजला. त्यामुळे पथकाने महिला पोलिसांसह अतिरिक्त पोलिसांना पाचारण केले. नंतर पोलिसांच्या सुरक्षेखाली ही मोहीम पार पडली.

ही कारवाई अतिक्रमण विभागाचे उपायुक्त महेश मोरोणे, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, लकडगंज झोनच्या सहायक आयुक्त साधना पाटील, हनुमाननगर झोनच्या सहायक आयुक्त शुभांगी मांडगे, निरीक्षक संजय कांबळे आदींच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता श्वेता दांडेकर, माहुरे, मौंदेकर, बानाबाकोड़े, सुरडकर, वडीवे, नंदनवार, भास्कर मालवे, सुनील बावणे, शादाब खान, आतिश वासनिक, विशाल ढोले यांनी ही कारवाई केली.

...

लकड़गंज झोनमध्ये ३२ अतिक्रमणांचा सफाया

लकड़गंज झोनमध्ये येणाऱ्या छापरू नगर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वैष्णव देवी चौक, हिवरीनगर ते जय भीम चौक, पडोळे नगर ते पॉवर हाऊस पर्यंतच्या मार्गात असलेल्या फूटपाथवर मोठ्या प्रमावर ठेले आणि अतिक्रमण उभे झाले होते. पथकाने केलेल्या कारवाईत ८ शेड, २ ठेले तोडले. यानंतर एचबी टाऊन ते पारडी चौकात अगदी मार्गालगत असलेले चिकन, मटनच विक्रीचे ८ शेड तोडण्यात आले. असे एकूण ३२ अतिक्रमण हटवून साहित्य जप्त करण्यात आले.

...

हनुमान नगर झोनमधील पतंगाची १२ दुकाने हटविली

हनुमान नगर झोनमध्ये येणाऱ्या गजानन चौक ते जुनी शुक्रवारी, ग्रेट नाग रोड या मार्गाच्या फूटपाथवर असलेली पतंग विक्रीची १२ दुकाने आणि आणि प्लास्टिक विक्रीचे एक दुकान हटविण्यात आले. या सोबतच आठ दुकानांचे शेड तोडण्यात आले. क्रीड़ा चौक ते मेडिकल चौकादरम्यान फूटपाथवर दुतर्फा असलेले ठेले आणि दुकाने हटविण्यात आली. येथील १४ दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले.

....

Web Title: Encroachment of sailors line deleted even after protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.