अखेर नागपूर विद्यापीठाच्या चारही विद्याशाखांना मिळाले अधिष्ठाता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 07:00 AM2020-11-02T07:00:00+5:302020-11-02T07:00:14+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिष्ठातापदाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी या पदावर चार जणांची नियुक्ती केली आहे.

In the end, all the four faculties of Nagpur University got the title | अखेर नागपूर विद्यापीठाच्या चारही विद्याशाखांना मिळाले अधिष्ठाता

अखेर नागपूर विद्यापीठाच्या चारही विद्याशाखांना मिळाले अधिष्ठाता

Next
ठळक मुद्देसिंगरू, वैष्णव, कविश्वर, सिंह यांची नियुक्ती

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिष्ठातापदाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी या पदावर चार जणांची नियुक्ती केली आहे. यात डॉ. राजश्री वैष्णव, डॉ. निर्मलकुमार सिंह, डॉ. राजेश सिंगरू, डॉ. संजय कविश्वर यांचा समावेश आहे.

विद्यापीठात गेल्या चार महिन्यापासून अधिष्ठातांची पदे रिक्त होती. यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या. अखेर या पदावर नियुक्ती झाली आहे. आंतरशास्त्रीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता म्हणून पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या प्रमुख डॉ. राजश्री वैष्णव, मानव्यशास्त्र शाखेत पदव्युत्तर लोकप्रशासन विभागाचे प्रमुख डॉ. निर्मलकुमार सिंह, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेत तिरपुडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्राध्यापक डॉ. संजय कविश्वर आणि विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत ताई गोळवलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांची नियुक्ती झाली आहे.

Web Title: In the end, all the four faculties of Nagpur University got the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.