अखेर उमरेड पालिकेला लाभले मुख्याधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:13 AM2021-09-10T04:13:40+5:302021-09-10T04:13:40+5:30
उमरेड : प्रभारी अधिकाऱ्यांची संख्या उमरेड विभागात अलीकडे अधिक प्रमाणात वाढली आहे. तब्बल नऊ महिन्यांपासून नगर पालिकेचा कारभारच प्रभारी ...
उमरेड : प्रभारी अधिकाऱ्यांची संख्या उमरेड विभागात अलीकडे अधिक प्रमाणात वाढली आहे. तब्बल नऊ महिन्यांपासून नगर पालिकेचा कारभारच प्रभारी मुख्याधिकाऱ्यांकडे होता. अशातच गुरुवारी उमरेड पालिकेला स्थायी मुख्याधिकारी लाभले.
प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या सुवर्णा दखणे यांची पनवेल महानगर पालिकेत सहायक आयुक्त म्हणून प्रशासकीय कारणास्तव रिक्त पदावर बदली झाली. त्यांच्याऐवजी यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ यांनी पदभार स्वीकारला. दखणे यांच्याकडे २३ जानेवारी २०२१ पासून उमरेड पालिकेचा अतिरिक्त कारभार आला होता. तत्पुर्वी राजेश भगत यांनी २५ जुलै २०१९ ते २२ जानेवारी २०२१ पर्यंत या पदावर काम पाहिले.
आता सुनील बल्लाळ हे स्थायी मुख्याधिकारी मिळाल्याने नागरिकांच्या समस्या, प्रश्न याकडे गांभीर्याने बघितले जाईल, असे बोलले जात आहे. दुसरीकडे प्रभारी उपमुख्याधिकारी या पदावर आकाश सहारे रूजू झाले आहेत. यापूर्वी ते वाडी नगर पंचायतीमध्ये कर्तव्यावर होते.