‘संप’ वार

By admin | Published: September 3, 2015 02:26 AM2015-09-03T02:26:46+5:302015-09-03T02:26:46+5:30

केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारीविरोधी धोरण, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, बेरोजगारी,श्रम कायदा , बेकायदेशीर ठेकेदारीवर प्रतिबंध घालण्यात यावा, ....

'End' war | ‘संप’ वार

‘संप’ वार

Next

केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारीविरोधी धोरण, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, बेरोजगारी,श्रम कायदा , बेकायदेशीर ठेकेदारीवर प्रतिबंध घालण्यात यावा, आदी मागण्यांसाठी विविध कर्मचारी संघटनांनी बुधवारी आंदोलन केले. कस्तूरचंद पार्कवर झालेल्या सभेत कर्मचारी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
प्रशासन गडबडले
शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाचा फटका जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालय, बँक, आयुर्विमा, शासकीय रुग्णालये, वन भवन, जुने सचिवालय, पाटबंधारे विभाग, मुद्रणालय, फॉरेन्सिक, धर्मादाय, आयटीआय, टेक्निकल हायस्कूल, कृषी विभाग, शिक्षण विभाग, भूमी अभिलेख, आरटीओ, आदिवासी आदींसह राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या दैनंदिन कामकाजाला बसला.
कोट्यवधींचा बँकिंग व्यवसाय ठप्प
नागपुरातील २८ राष्ट्रीयीकृत बँकांच्या सर्वच शाखांमध्ये बँकिंग कामकाज ठप्प होते. बहुतांश राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांचे एटीएम कोरडे झाले. सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने नागपुरात १२०० ते १४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले.
आरोग्य व्यवस्था कोलमडली
आरोग्य सेवेचा महत्त्वाचा कणा मानल्या जाणाऱ्या परिचारिकांनी संपात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याने, शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली होती. त्यामुळे ओपीडीच्या रुग्णापासून, वॉर्डातील रुग्णांच्या वेदना समजणारा कुणीही नसल्याने रुग्णांचे हाल झाले.

Web Title: 'End' war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.