शस्त्रक्रियेशिवाय एण्डोस्कॉपीद्वारे उपचार शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 10:29 PM2018-02-17T22:29:02+5:302018-02-17T22:44:53+5:30

पोटाच्या आजारावरील उपचारासाठी एण्डोस्कोपी वरदान ठरत आहे. एण्डोस्कोपी हे केवळ निदानाचे साधन नाही तर त्याद्वारे मोठ्या आजारांवर उपचारही शक्य झालेत. नव्या टेक्नॉलॉजीमुळे पोटविकाराच्या सर्व मोठ्या आजारांवर शस्त्रक्रियेशिवाय एण्डोस्कोपीद्वारे उपचार करणे शक्य झाले आहे. एका प्रकरणात अन्ननलिकेचा कॅन्सरने पीडित रुग्णामध्ये एण्डोस्कोपीद्वारे तोंडावाटे स्टेंट टाकून बंद झालेल्या अन्ननलिकेचा मार्ग खुला करण्यात यश आले, अशी माहिती अमेरिकेतील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. कुलविंदर दुवा यांनी दिली.

Endoscopy treatment can be done without surgery | शस्त्रक्रियेशिवाय एण्डोस्कॉपीद्वारे उपचार शक्य

शस्त्रक्रियेशिवाय एण्डोस्कॉपीद्वारे उपचार शक्य

Next
ठळक मुद्देकुलविंदर दुवा यांची माहिती : दोन दिवसीय ‘गॅस्ट्रोकॉन-२०१८’ परिषदेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोटाच्या आजारावरील उपचारासाठी एण्डोस्कोपी वरदान ठरत आहे. एण्डोस्कोपी हे केवळ निदानाचे साधन नाही तर त्याद्वारे मोठ्या आजारांवर उपचारही शक्य झालेत. नव्या टेक्नॉलॉजीमुळे पोटविकाराच्या सर्व मोठ्या आजारांवर शस्त्रक्रियेशिवाय एण्डोस्कोपीद्वारे उपचार करणे शक्य झाले आहे. एका प्रकरणात अन्ननलिकेचा कॅन्सरने पीडित रुग्णामध्ये एण्डोस्कोपीद्वारे तोंडावाटे स्टेंट टाकून बंद झालेल्या अन्ननलिकेचा मार्ग खुला करण्यात यश आले, अशी माहिती अमेरिकेतील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. कुलविंदर दुवा यांनी दिली.
मिडास मेडिकल फाऊंडेशन व रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूरच्या वतीने आयोजित ‘गॅस्ट्रोकॉन-२०१८’परिषदेला शनिवारपासून सुरुवात झाली. या परिषदेच्या औपचारिक उद्घाटनानंतर ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. दुवा म्हणाले, एण्डोस्कोपीच्या नव्या टेक्नालॉजीमुळे शस्त्रक्रियेच्या तुलनेत अत्यल्प खर्च येतो. रुग्णालयात भरती होण्याची गरज नसते तसेच शरीराची कुठेही चिरफाड केली जात नाही. त्यामुळे रुग्णाची शारीरिक हानी होत नाही.
अन्ननलिकेच्या पुनरुत्पादनाला यश
डॉ. दुवा म्हणाले, अन्ननलिकेच्या पुनर्जननच्या (रिजनरेशन) प्रयत्नाला पहिल्यांदाच यश प्राप्त झाले. प्लुरीपोटेंट स्टेम सेल्स म्हणजेच दुसऱ्या  पेशींना जन्म देणाºया मूळपेशींमुळे हे शक्य झाले. एका २४ वर्षीय युवकाला अन्ननलिकेचा कॅन्सर झाल्याने पाच सेंटीमीटरपर्यंत अन्ननलिका कापावी लागली. अन्ननलिका व पोटाचा आकार कायम ठेवत कापलेल्या जागी स्टेंट टाकण्यात आली. चार वर्षानंतर स्टेंटच्या जागेवर अन्ननलिकेचे ‘रिजनरेशन’ झाल्याचे आढळून आले.
अ‍ॅसिडिटीवरील औषधांनी मूत्रपिंड निकामी होऊ शकते
डॉ. दुवा म्हणाले, अ‍ॅसिडिटीवर ६० टक्के लोक विना डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेतात. हे घातक ठरू शकते. कारण अ‍ॅसिडिटी ही अ‍ॅसिडिटी असतेच असे नाही, ती एखाद्या गंभीर आजाराची लक्षणेही असू शकतात. अ‍ॅसिडिटीच्या औषधांचे साईड इफेक्ट्स खूप जास्त असतात. मूत्रपिंड निकामी होणे, डिमेन्शिया होणे, हाडे ठिसूळ होणे आदी समस्या निर्माण होऊ शकतात.
लिव्हर सिरोसिसवर प्रभावी औषधे उपलब्ध - डॉ. श्रीकांत मुकेवार
मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक व या परिषदेचे आयोजन सचिव डॉ. श्रीकांत मुकेवार म्हणाले, ‘लिव्हर सिरोसिसवर’ प्रभावी औषध उपलब्ध झाल्याने आता सिरोसिस सामान्य होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका पाहणीत ७५ सिरोसिसच्या रुग्णांवर औषधोपचारानंतर त्यांची ‘बायोप्सी’ केल्यानंतर ७० टक्के सिरोसिस सामान्य झाल्याचे सामोर आले आहे. योग्य औषधोपचारांमुळे लिव्हर (यकृत) प्रत्यारोपण टाळणेही शक्य झाले आहे.
‘फॅटी लिव्हर’चा धोका लक्षात घ्या-डॉ. सौरभ मुकेवार
डॉ. सौरभ मुकेवार म्हणाले, लिव्हर (यकृत) स्थुलता (फॅटी) असणे हे सामान्य मानले जाते. परंतु असे नाही, फॅटी लिव्हर कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते. बदलत्या जीवनशैलीमुळे ‘फॅटी लिव्हर’चा आजार बळावत आहे. अत्यंत गंभीर यकृताच्या आजराच्या कारणांपैकी हा आजार समोर आला आहे. ‘फॅटी लिव्हर’ हा आजार रोखता येण्यासारखा आहे. फक्त सुरुवातीच्या टप्प्यात केवळ जीवनशैलीत बदल करावा लागतो. नियमित व्यायाम व स्थुलतेवर लक्ष ठेवल्यास हा आजार उद्भवत नाही.
दोन दिवसीय ‘गॅस्ट्रोकॉन’ परिषदेत देशातून जवळपास १००० डॉक्टर सहभागी झाले आहेत. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. श्रीकांत मुकेवार यांच्यासह डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. शरद देशमुख, डॉ. आनंद तोडगी, पवन लापसेटवार, विजय सालंकर, विजय वर्मा, डॉ. अभय लांजेवार, डॉ. सुरेश जळगावकर आदी सहकार्य करीत आहेत.

Web Title: Endoscopy treatment can be done without surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.