पाच वर्षात विदर्भातील १.८४ लाख कृषीपंपांचे ऊर्जीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:17 PM2019-08-30T23:17:38+5:302019-08-30T23:19:08+5:30

महावितरणने मागील पाच वर्षात विदर्भातील १ लाख ८४ हजार २१७ कृषीपंपांचे परंपरागत पद्धतीने ऊर्जीकरण केले आहे, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर करण्यात आलेल्या एकूण कृषीपंपांच्या ऊर्जीकरणाच्या प्रमाणात हे प्रमाण सुमारे २८ टक्के आहे.

Energy of Vidarbha 1.84 lakh agricultural pumps in five years | पाच वर्षात विदर्भातील १.८४ लाख कृषीपंपांचे ऊर्जीकरण

पाच वर्षात विदर्भातील १.८४ लाख कृषीपंपांचे ऊर्जीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणने मागील पाच वर्षात विदर्भातील १ लाख ८४ हजार २१७ कृषीपंपांचे परंपरागत पद्धतीने ऊर्जीकरण केले आहे, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर करण्यात आलेल्या एकूण कृषीपंपांच्या ऊर्जीकरणाच्या प्रमाणात हे प्रमाण सुमारे २८ टक्के आहे. सोबतच पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाचे ऊर्जीकरण करण्याचे कामही सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
३१ मार्च २०१४ रोजी विदर्भातील अकराही जिल्ह्यात ऊर्जीकरण झालेल्या कृषीपंपांची एकूण संख्या ही ६ लाख ५५ हजार ९४ एवढी होती. यात मागील पाच वर्षात तब्बल १ लाख ८४ हजार २१७ ने वाढ होऊन ३१ मार्च २०१९ रोजी विदर्भातील ऊर्जीकरण झालेल्या कृषीपंपांची एकूण संख्या ८ लाख ३९ हजार ३११ म्हणजेच सुमारे २८ टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय चालू आर्थिक वर्षात ३० जून २०१९ पर्यंत ५ हजार १८८ कृषीपंपांचे ऊर्जीकरण करण्यात आले असून पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या कृषीपंपांना वीज जोडणी देण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे.
३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या सर्व कृषीपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीच्या माध्यमातून ३१ मार्च २०२० पर्यंत वीजजोडण्या देण्यासाठी महावितरणतर्फे मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली असून निर्धारित वेळेत या सर्व वीजजोडण्या केल्या जातील असा विश्वास महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी व्यक्त केला आहे.
पाच वर्षात जिल्हानिहाय कृषीपंपाचे झालेले ऊर्जीकरण

जिल्हा      कृषीपंपाची संख्या      चालू आर्थिक वर्षात
------------------------------------
अकोला   १४ हजार ७५६             ३७५
बुलडाणा  २५ हजार ५०३         १,३६८
वाशिम     १२ हजार ५७२            ३४२
अमरावती २५ हजार ८३३        ४८०
यवतमाळ २१ हजार २२८       ६६२
चंद्रपूर      १४ हजार ४३          २११
गडचिरोली १३ हजार ९२३    २०३
भंडारा     ११ हजार ४६५         ३८२
गोंदिया   १३ हजार ५७३        ४२३
नागपूर   १४ हजार ८९६        ५१९
वर्धा    १६ हजार ४२५             २२३

Web Title: Energy of Vidarbha 1.84 lakh agricultural pumps in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.