Maharashtra HSC result 2018 : नागपूर विभागात ‘इंग्रजी’च ‘किलर’ व गणितात ९६ टक्के उत्तीर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 10:16 PM2018-05-30T22:16:52+5:302018-05-30T22:17:04+5:30

बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये नागपूर विभागात ५८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. २०१७ च्या तुलनेत या आकड्यामध्ये १७ विषयांची वाढ झाली आहे. दरम्यान, मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील इंग्रजी भाषेचा निकाल माघारल्याचे दिसून आले. एकूण १३७ अभ्यासक्रमांपैकी सर्वात कमी टक्केवारी इंग्रजी विषयाची आहे.

'English' killer in Nagpur division: 96 percent pass percentage in mathematics | Maharashtra HSC result 2018 : नागपूर विभागात ‘इंग्रजी’च ‘किलर’ व गणितात ९६ टक्के उत्तीर्ण 

Maharashtra HSC result 2018 : नागपूर विभागात ‘इंग्रजी’च ‘किलर’ व गणितात ९६ टक्के उत्तीर्ण 

Next
ठळक मुद्दे५८ विषयांचा ‘सेंट परसेंट’ निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये नागपूर विभागात ५८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. २०१७ च्या तुलनेत या आकड्यामध्ये १७ विषयांची वाढ झाली आहे. दरम्यान, मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील इंग्रजी भाषेचा निकाल माघारल्याचे दिसून आले. एकूण १३७ अभ्यासक्रमांपैकी सर्वात कमी टक्केवारी इंग्रजी विषयाची आहे. यंदा इंग्रजीत ८७.०५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मागील वर्षी हेच प्रमाण ८८.९८ टक्के इतके होते.
गणित व इंग्रजीची विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती वाटत असते. परंतु गणिताचा निकाल यंदा चक्क ९५ टक्क्यांच्या वर लागला आहे. नागपूर विभागात गणिताचा निकाल ९६.५६ टक्के इतका लागला आहे. याशिवाय भौतिकशास्त्र (९८.३६ %), जीवशास्त्र (९९.०१%) व रसायनशास्त्र (९८.९९ %)या विषयांचा निकालदेखील उत्तम लागला आहे. मराठीचा निकाल ९५.३१ टक्के तर हिंदीचा निकाल ९८.०७ टक्के लागला आहे. संस्कृतमध्ये ९९.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
११ विषयांना प्रत्येकी एकच परीक्षार्थी
यंदा १३७ पैकी ४८ विषयांमध्ये २५ किंवा त्याहून कमी परीक्षार्थी होते. ११ विषयांमध्ये तर प्रत्येकी एकच परीक्षार्थी होता. हे सर्व जण उत्तीर्ण झाले आहेत. विभागात सर्वात अधिक १ लाख ६९ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयांची परीक्षा दिली. तर १ लाख १८ हजार ९८५ विद्यार्थी मराठीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते.

शंभर टक्के निकाल लागलेले विषय
-फ्रेंच
-जर्मन
-जापनीज्
-इंग्रजी लिटरेचर
-पर्यावरण शिक्षण
-जिआॅलॉजी
-ड्रॉर्इंग
-हिस्ट्री आॅफ आर्टस्
-व्होकल लाईट म्युझिक
-व्होकल क्लासिकल म्युझिक
-डिफेन्स स्टडीज्
-मेकॅनिकल मेन्टेनन्स
-स्कूटर अ‍ॅन्ड मोटरसायकल सर्व्हिसिंग
-जनरल सिव्हिल इंजिनिअरींग
-आॅफिस मॅनेजमेन्ट
-हॉर्टिकल्चर
-आॅटोमोबाईल सर्व्हिस टेक्निक
-इलेक्ट्रिकल अप्लिकेशन मेन्टेनन्स-१/२/३
-बिल्डिंग मॅनेजमेन्ट-१/२/३
-कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी-२/३
-आॅटो इंजिन टेक्निशियन-१/२/३
-मेकॅनिकल टेक-१/२/३
-अ‍ॅग्रीकल्चर हॉर्टिकल्चर-१/२/३
-बिझनेस फायनॅन्शियल अकाऊन्ट आॅडिट-१/२/३
-मार्केटिंग सेल्समॅनशीप-१/२/३
-स्टोअर किपिंग-१/२/३
-रेडिओलॉजी टेक्निशियन-१/२/३
-चाईल्ड केअर-१/२/३
-आॅप्थॅल्मिक टेक्निशियन-१/२/३
-मेन्टेनन्स रिवार्इंड-१/२/३
-टुरिझम अ‍ॅन्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट-१/२/३

Web Title: 'English' killer in Nagpur division: 96 percent pass percentage in mathematics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.