रिसोर्टमध्ये मनसोक्त आनंद लुटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:06 AM2021-07-10T04:06:39+5:302021-07-10T04:06:39+5:30
डॉ. राजेंद्र एस. पडोळे दि टायगर पॅराडाईज रिसोर्ट व वॉटर पार्क रोजगार देण्याचे स्वप्न पूर्ण नागपूर : कोरोना काळात ...
डॉ. राजेंद्र एस. पडोळे
दि टायगर पॅराडाईज रिसोर्ट व वॉटर पार्क
रोजगार देण्याचे स्वप्न पूर्ण
नागपूर : कोरोना काळात लोक घरात बंदिस्त झाले होते. आता ते एखाद्या निसर्गरम्य वातावरणात आणि आवडीच्या ठिकाणी सुट्या घालवत आहेत. त्यातच नागपूरपासून ५२ किमी अंतरावरील दि टायगर पॅराडाईज रिसोर्ट अॅण्ड वॉटर पार्क निसर्गरम्य ठिकाण लोकांसाठी उपलब्ध आहे. वीकेंड सुट्या घालवून मनाला आल्हाद देणारे हे ठिकाण आहे. राजकीय, सामाजिक , बांधकाम आणि कला क्षेत्रात नाव कमविल्यानंतर डॉ. राजेंद्र पडोळे यांनी या रिसोर्टची उभारणी ७.५ एकरात केली. लोकांनी किफायत दरातील रिसोर्टमध्ये जाऊन कऱ्हांडला जंगल सफारीचा आनंद लुटावा, असे पडोळे यांचे आवाहन आहे.
रिसोर्ट व वॉटर पार्क नागपूरपासून ५२ किमी, उमरेडपासून ५ किमी अंतरावर भिवापूर मार्गावर कऱ्हांडला-तिरखुरा गावात अभयारण्य कऱ्हांडला गेटलगत आहे. पॅकेजची सोय आहे. जंगल सफारीकरिता बुकिंग करून देण्यात येते. अनेकदा गेटवर वाघ आणि अन्य प्राणी दिसतात. २०१७ मध्ये बांधकाम सुरू होऊन २०१९ मध्ये रिसोर्ट लोकांसाठी खुले झाले. आतापर्यंत १० हजार लोकांनी भेटी दिल्या आहेत. येथे २६ खोल्या असून १८ कोटींची गुंतवणूक केली आहे. पडोळे म्हणाले, या गोष्टीचा गंध नव्हता, पण आवड आणि काम तडीस नेण्याच्या जिद्दीने प्रकल्प दोन वर्षांतच बांधून पूर्ण केला. लग्नसमारंभासाठी लोकांची पहिली पसंती आहे. कॉन्फरन्स व अन्य कार्यासाठी रिसोर्ट खुले असते. कोरोनानंतर रिसोर्ट लोकांसाठी खुले झाले आहे. वीकेंडला दोन दिवस थांबून मनोरंजन आणि जंगल सफारीचा आनंद घेता येतो. पाणी अडवा, पाणी जिरवा, या प्रकल्पाची निर्मिती रिसोर्टमध्ये केल्याने शाळा आणि कॉलेजच्या सहलींसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
पडोळे म्हणाले, लहापणापासूनच लोकांना रोजगार देण्याच्या इच्छेमुळे रिसोर्टची उभारणी केली. स्थानिक १०० पेक्षा जास्त लोकांना रोजगार दिला आहे. रिसोर्ट नेहमीच फुल्ल असते. सिव्हील इंजिनियर मुलगा रिषभ पडोळे प्रकल्पाचे संचालन करतो. तो ‘अॅट्रॉसिटी’ मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. मनोरंजनाच्या सर्व सुविधा एकाच छताखाली असल्याने रिसोर्ट लोकांच्या आवडीचे ठिकाण बनले आहे.
डॉ. राजेंद्र पडोळे व्यवसायाने इंजिनियर आहेत. ते काही काळ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. शिक्षण घेत असताना १९ व्या वर्षीपासून इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय सुरू केला. २००३ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र व्यापक आणि सर्वांसाठी खुले झाल्यानंतर त्यांनी डेव्हलपर्स व बांधकाम क्षेत्रात पदार्पण केले. २००४ मध्ये न्यू प्रॉस्पॉरिटी लॅण्ड डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स प्रा.लि. कंपनी स्थापन केली. तेव्हापासून मागे वळून पाहिले नाही. व्यवसायात यश संपादन केले. कंपनीचे कार्यालय जी-१, तुळजा भवानी अपार्टमेंट, छत्रपती हॉलजवळ, छत्रपतीनगर येथे आहे. कंपनीने जवळपास ४० ले-आऊट विकले आहेत. हजारो संतुष्ट ग्राहक आहेत. वानाडोंगरी, गोटाळपांजरी, घोगली, बेसा, चिकना, धामना, कालडोंगरी, कुही हे त्यापैकी काही आहेत. ग्राहकांचा विश्वास संपादन केला. मानेवाडा येथे कलावती-मंजुषा नावाने स्कीम, मुंबईत (नेरळ) दीड एकरात साई-ताज रेसिडेन्सी स्कीम उभारली. आता वानाडोंगरी येथे पाच एकरात ४०० फ्लॅट, ५० रो-हाऊसेस व व्यावसायिक संकुलाची स्कीम उभारणार आहे.
पडोळे यांना कलेची लहापणापासूनच आवड आहे. ते उत्तम गायक आहेत. त्यांनी ‘अॅट्रॉसिटी’ आणि पोथराज समाजावर आधारित ‘वाक्या’ मराठी चित्रपट काढला. सध्या सामाजिक विषयावर आधारित ‘विटाळ’ चित्रपटाची तयारी सुरू आहे. या चित्रपटाचा शुभारंभ १५ ऑगस्टला रिसोर्टमध्ये होणार आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका बजावणारे चालू पांडे उर्फ दयाशंकर पांडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. पुढेही चित्रपट निर्मितीचा क्रम सुरूच राहणार आहे. कंपनी सुरू केल्यानंतर मित्रमंडळींना जोडले, त्यांना रोजगार देऊन स्वत:च्या पायावर उभे केले. कोरोना काळात अनाथ झालेल्या १० ते १५ मुलांची जबाबदारी घेण्याची इच्छा आहे. या सर्व कामात पत्नी मनिषा आणि मुलगा रिषभ यांचे सहकार्य नेहमीच असते. मनिषा स्त्रीधन महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा आहेत.
व्यवसायसंपन्न डॉ. राजेंद्र पडोळे म्हणाले, लहानपणी समाजसेवेसाठी राजाभाऊ हातेकर गुरुजींनी प्रेरित केले. गिरीश देशमुख यांच्या भेटीचा योग आला. दिलीप जाधव यांनी व्यवसायासाठी प्रेरणा दिली. पुढे व्यावसायिक , सामाजिक व राजकीय गोष्टी घडत गेल्या. सन २०१४ मध्ये दक्षिण-पश्चिम क्षेत्रात देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध विधानसभेची निवडणूक लढविली. २० हजार मते घेतली होती. याशिवाय समाजसेवेची आवड आहे. सर्व समाजातील लोकांसाठी समाजकार्य करण्याचे व्रत आहे. ते आयुष्यभर पार पाडणार आहे.
पडोळे म्हणाले, अडचणींवर मात करून यश संपादन करण्याचे नाव जीवन आहे. जीवनाचे पॅकेज ६० ते ७० वर्षांचे असते. या वर्षांत जे चांगले वाटेल ते आणि आनंद व संतुष्टी मिळेल, ते काम करावे. चांगले काम करताना नफा-तोट्याचा विचार करीत नाही. इमानदारीने काम केल्यास कोणत्याही क्षेत्रात पैसा, आनंद, संतुष्टी मिळतेच.