घरकूल पूर्ण करणाऱ्यांना चाव्या देऊन गृहप्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:07 AM2021-06-23T04:07:18+5:302021-06-23T04:07:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीमध्ये घरकूल बांधकाम युद्धस्तरावर करण्यात आले. दिलेल्या मुदतीत घरकुलांचे काम पूर्ण करणाऱ्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीमध्ये घरकूल बांधकाम युद्धस्तरावर करण्यात आले. दिलेल्या मुदतीत घरकुलांचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देऊन गृहप्रवेश करण्यात आला. खंडविकास अधिकारी महेश्वर डोंगरे यांच्या मार्गदर्शनात घरकूल लाभार्थ्यांना बांधकामासंदर्भात मार्गदर्शन करणे, मागील वर्षी बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलात गृहप्रवेश यासारखे उपक्रम राबविण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन २०२०-२१ साठी १,६७० घरे मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी ४०० घरांची कामे सुरू असून, ९६५ घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. साेबतच ८७ लाभार्थ्यांना विनामूल्य जागा वाटप करण्यात आले. तसेच शबरी आवास योजनेंतर्गत कळमेश्वर तालुक्याला २५ चे लक्ष्यांक असून, ११ कामे पूर्ण झाले आहे. रमाई आवास योजनेंतर्गत ८५ घरांचे लक्ष्यांक असून, ८५ मंजूर करण्यात आली आहे.
तालुक्यातील घरकुलांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण कसे करता येईल, याकरिता खंडविकास अधिकारी महेश्वर डोंगरे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण गृहनिर्माण अभियंता कांतेश्वर टेकाडे, ग्रामविकास अधिकारी हितेंद्र फुले, नरेश चोखांद्रे, ग्रामसेवक सुषम जाधव, विक्रांत आखाडे, प्रवीण वाटकर, एस. जी. जुनघरे, भैयाजी उके, महेंद्र निमजे, पी. पी. शिंगणजुडे, बी. व्ही. जिरापुरे, ग्रामसेविका मायावती देशपांडे, रंजना बागाईतकर, पी. एम. गणोरकर, मनिषा राठोड आदी प्रयत्नरत आहेत.