न्यायाधीशांच्या खोलीत घुसून तोडफोड : नागपूर जिल्हा न्यायालयातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 08:57 PM2019-05-31T20:57:06+5:302019-05-31T20:58:06+5:30

जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या खासगी खोलीत बळजबरीने घुसून तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली.

Entering Judge's chamber and ransacked :Incident in Nagpur District Court | न्यायाधीशांच्या खोलीत घुसून तोडफोड : नागपूर जिल्हा न्यायालयातील घटना

न्यायाधीशांच्या खोलीत घुसून तोडफोड : नागपूर जिल्हा न्यायालयातील घटना

googlenewsNext
ठळक मुद्दे निलंबित सफाई कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या खासगी खोलीत बळजबरीने घुसून तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. हेमंत रामराव वाहणे (४२) रा. कमाल टॉकीज रोड मिलिंदनगर असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी हेमंत वहाणे हा न्यायमंदिर या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत सफाई कामगार असून सध्या तो निलंबित आहे. मागील नऊ महिन्यापासून आरोपी निलंबित आहे. न्यायमंदिर इमारतीच्या सातव्या माळ्यावर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांची खासगी खोली आहे. हेमंत वहाणे गुरुवारी दुपारी तिथे आला आणि न्यायाधीशांना त्यांच्या खासगी कक्षात भेटण्याची परवानगी मागितली. परंतु त्याला परवानगी नाकारण्यात आली. तेव्हा हेमंत हा बळजबरीने कक्षात घुसण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा तेथील कर्मचारी अरविंद गुलाबराव बरबटकर (५७) यांनी त्याला रोखले. तेव्हा आरापीने त्यांना अश्लील शिवीगाळ करीत खोलीतील खिडकीवर जोरदारपणे मारून काच फोडले. बरबटकर यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपीरिुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे

Web Title: Entering Judge's chamber and ransacked :Incident in Nagpur District Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.