चाहत्यांमध्ये उत्साह : शुटिंगसाठी बॉलिवूडचा शहनशाह नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 09:12 PM2018-12-03T21:12:00+5:302018-12-03T21:16:09+5:30

झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला उपराजधानीत सुरुवात झाली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात भूमिका असून ते सोमवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे नागपूरचे क्रीडा संघटक व फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट राहणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे ‘झुंड’ नावाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या रूपाने नागपूरची ओळख आता ‘बॉलिवूड’मध्येदेखील प्रस्थापित होणार आहे.

The enthusiasm among fans: Bollywood's Shahanshah for shooting in Nagpur | चाहत्यांमध्ये उत्साह : शुटिंगसाठी बॉलिवूडचा शहनशाह नागपुरात

चाहत्यांमध्ये उत्साह : शुटिंगसाठी बॉलिवूडचा शहनशाह नागपुरात

Next
ठळक मुद्देमोहननगरातील शाळेच्या मैदानात उभारला सेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झोपडपट्टीतील हजारो मुलांना खेळाची नवी दिशा दाखविणाऱ्या नागपूरच्या ‘स्लम सॉकर’वर आधारित चित्रपटाच्या शुटिंगला उपराजधानीत सुरुवात झाली आहे. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची या चित्रपटात भूमिका असून ते सोमवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. फुटबॉलच्या माध्यमातून अनेक गरीब व झोपडपट्टीतील तरुणांचे आयुष्य बदलविणारे नागपूरचे क्रीडा संघटक व फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट राहणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे हे ‘झुंड’ नावाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या रूपाने नागपूरची ओळख आता ‘बॉलिवूड’मध्येदेखील प्रस्थापित होणार आहे.
सकाळी ११.३० च्या सुमारास मुंबईहून अमिताभ बच्चन यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. मोहननगरातील एका शाळेच्या परिसरात चित्रपटाचा ‘सेट’ उभारण्यात आला आहे. ‘बिग बी’ यांची एक झलक मिळेल या अपेक्षेने त्यांचे चाहते परिसरात पोहोचले होते. मात्र त्यांची निराशा झाली. कारण प्रत्यक्षात सोमवारी ‘बिग बी’ शुटिंगला गेलेच नाही. वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्येच ते थांबले होते.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे शुटिंग ४० ते ४५ दिवस चालणार आहे. मात्र ‘बिग बी’ सलग नागपुरात राहणार नसून आवश्यकतेनुसार ते ये-जा करणार आहेत. मुंबईतील काही समारंभामध्येदेखील त्यांना सहभागी व्हायचे आहे. त्यामुळे सर्व वेळापत्रक त्या हिशेबाने बनविण्यात आले आहे.
‘शुटिंग’च्या परिसरात कडेकोट बंदोबस्त 


मोहननगर परिसरातील एका शाळेच्या मागील बाजूच्या मैदानात चित्रपटाचा ‘सेट’ तयार करण्यात आला आहे. ‘बिग बी’ नागपुरात आल्याची माहिती मिळताच चाहत्यांनी तिकडे धाव घेतली. मात्र या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. शाळेच्या मागील बाजूला जाण्यास शाळेतील कर्मचाऱ्
यांनादेखील मज्जाव करण्यात आला आहे. मैदानाकडे जाणाऱ्या दुसऱ्या द्वारातून केवळ परिसरातील रहिवासी व विद्यार्थ्यांच्या पालकांना विशेष ‘पास’ दाखविल्यानंतरच प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशद्वारावरच नागरिकांना थांबविण्यात येत होते. तर आतील भागात ‘बॅरिकेट्स’ लावण्यात आले आहेत. सोबतच ‘बाऊन्सर्स’ व सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांनादेखील आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
कोण आहेत विजय बारसे ?
हिस्लॉप महाविद्यालयात शारीरिक शिक्षक राहिलेले प्रा. बारसे यांनी क्रीडा विकास मंचच्या माध्यमातून झोपडपट्टीतील तरुणांसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित करून त्यांना व्यासपीठ मिळवून दिले. ‘स्लम सॉकर’चे प्रणेते अशी त्यांची ओळख आहे. वाईट मार्गाला गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणले. बारसेंनी दिशा दाखविल्यामुळे घडलेल्या शेकडो फुटबॉलपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवून नागपूर व देशाला नावलौकिक मिळवून दिला. शिवाय राज्यभरात ‘स्लम सॉकर’ला तरुणांनी डोक्यावर घेतले.

Web Title: The enthusiasm among fans: Bollywood's Shahanshah for shooting in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.