लोकांमध्ये उत्साह, पण लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:07 AM2021-07-26T04:07:10+5:302021-07-26T04:07:10+5:30

आज मनपा केंद्रामध्ये मर्यादित लसीकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. ...

Enthusiasm among people, but lack of vaccines | लोकांमध्ये उत्साह, पण लसीचा तुटवडा

लोकांमध्ये उत्साह, पण लसीचा तुटवडा

Next

आज मनपा केंद्रामध्ये मर्यादित लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. परंतु मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने आठवड्यात दोन-तीन लसीकरण केंद्र सुरू असताना चार ते पाच् दिवस डोस उपलब्ध न झाल्याने लसीकरण बंद ठेवावे लागते. आज सोमवारी मनपाची लसीकरण केंद्र सुरू राहतील, परंतु प्रत्येक केंद्राला १०० डोस उपलब्ध केले जाणार आहेत.

कोविशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल. लसीकरण सकाळी १० वाजता सुरू होईल.

मनपा आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोविशिल्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोविशिल्डचे लसीकरण सकाळी १० वाजता सुरू होईल.

तसेच १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, स्व. प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र येथे उपलब्ध राहील. अशी माहीत प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: Enthusiasm among people, but lack of vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.