‘अंतर्वेध’ म्हणजे भावनांची अभिव्यक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 08:44 PM2018-04-06T20:44:05+5:302018-04-06T20:44:27+5:30
चित्रित मनुष्याकृतीच्या चेहऱ्यावरील भावदर्शन म्हणजे चित्रातील समग्र अभिव्यक्ती आहे. चित्रावकाशातील विविध आकारांच्या परस्परसंबंधातून परिणत होणारी समग्र आकृतीची जिवंत सळसळ, हीच खरी चित्रकलेतील अभिव्यक्ती. कधी ती माणसे, पशू, पक्षी, घरे, झाडे अशा वस्तुनिष्ठ आकारांतून, तर कधी वस्तुनिरपेक्ष अप्रतिमरूप आकारांतून प्रकट होत असते. ‘अंतर्वेध’च्या चित्रामधूनही याचेच दर्शन घडते, असे प्रतिपादन व्हीआयएल कंपनीच्या संचालक वंदना लखानी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चित्रित मनुष्याकृतीच्या चेहऱ्यावरील भावदर्शन म्हणजे चित्रातील समग्र अभिव्यक्ती आहे. चित्रावकाशातील विविध आकारांच्या परस्परसंबंधातून परिणत होणारी समग्र आकृतीची जिवंत सळसळ, हीच खरी चित्रकलेतील अभिव्यक्ती. कधी ती माणसे, पशू, पक्षी, घरे, झाडे अशा वस्तुनिष्ठ आकारांतून, तर कधी वस्तुनिरपेक्ष अप्रतिमरूप आकारांतून प्रकट होत असते. ‘अंतर्वेध’च्या चित्रामधूनही याचेच दर्शन घडते, असे प्रतिपादन व्हीआयएल कंपनीच्या संचालक वंदना लखानी यांनी केले. स्रेहल ओक-लिमये यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत झाले. यावेळी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर ललित कला विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. विनोद इंदूरकर उपस्थित होते. स्रेहल ओक-लिमये यांच्या कुंचल्यातून हे चित्र साकारले असून त्यांनी या चित्रातून अंतर्मनाचा अंतर्वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे चित्र प्रदर्शन ९ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते ८या वेळेत सुरू राहणार आहे. याप्रसंगी सदानंद चौधरी, मौक्तिक काटे, प्रशांत गडपायले, मकरंद अलाटेकर, प्रकाश बेतावार, डॉ. रवींद्र हरदास, डॉ. नीलेश चव्हाण, महेश मानकर उपस्थित होते.