उद्योजक अजित दिवाडकर यांचे निधन

By मोरेश्वर मानापुरे | Published: July 16, 2024 08:45 PM2024-07-16T20:45:21+5:302024-07-16T20:45:37+5:30

- विदर्भाच्‍या नाट्य व उद्योग क्षेत्राची मोठी हानी

Entrepreneur Ajit Diwadkar passed away | उद्योजक अजित दिवाडकर यांचे निधन

उद्योजक अजित दिवाडकर यांचे निधन

नागपूर: दिवाडकर्स अजित बेकरीचे संचालक व ज्‍येष्‍ठ रंगकर्मी अजित दिवाडकर यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्‍यूसमयी ते ८० वर्षांचे होते. त्‍यांच्‍यापश्‍चात पत्‍नी निलिमा, मुलगा विक्रम, सून मीरा, मुलगी अवंती व जावई अभिराम देशमुख आणि बराच आप्‍तपरिवार आहे. अंत्‍ययात्रा ५०, नवजीवन कॉलनी, माधव नेत्रालयाजवळ, वर्धा रोड या त्‍यांच्‍या राहत्‍या घरून बुधवारी सकाळी ९.३० वाजता निघेल. त्‍यांच्‍या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येणार आहे.

लहानपणापासूनच नाट्यकलेची आवड असणाऱ्या अजित दिवाडकर यांनी वडील प्रभाकर दिवाडकर याच्‍या दिग्‍दर्शनात अनेक नाटकांमध्‍ये भूमिका केल्‍या होत्‍या. पूर्वीच्‍या धनवटे रंगमंदिरमध्‍ये कॅन्‍टीनचा व्‍यवसाय केला. महाविद्यालयात शिकत असताना अनेक नाटकांमध्‍ये भूमिका करणाऱ्या अजित दिवाडकर यांनी मेरू मंदार धाकुटे, रुद्रवर्षा, वेदनेचा वेद झाला, होती एक शारदा, बॅरिस्‍टर अशा अनेक दर्जेदार नाटकांमध्‍ये भूमिका केल्‍या व पारितोषिकेही पटकावली. 

१९५५ साली अजित बेकरी सुरू करणाऱ्या दिवाडकर यांनी अतिशय कष्‍टाने हा व्‍यवसाय उभा केला आणि नावारुपाला आणला. नाट्यकर्मी व उद्योजक असलेल्‍या अजित दिवाडकर यांच्‍या अचानक जाण्‍याने नाट्यक्षेत्र व व्‍यवसाय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

Web Title: Entrepreneur Ajit Diwadkar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर