लोकमतची उपक्रमशीलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:17+5:302020-12-15T04:25:17+5:30

धार्मिक अंधश्रद्धा, बुवाबाजी, हुंडाविरोधी आंदोलन, समतावादी चळवळी यांच्यापासून तर नामांतराच्या लढ्यापर्यंत प्रत्येक चळवळीच्या सोबत लोकमत राहिले आहे. त्यामुळे प्रत्येक ...

Entrepreneurship of Lokmat | लोकमतची उपक्रमशीलता

लोकमतची उपक्रमशीलता

Next

धार्मिक अंधश्रद्धा, बुवाबाजी, हुंडाविरोधी आंदोलन, समतावादी चळवळी यांच्यापासून तर नामांतराच्या लढ्यापर्यंत प्रत्येक चळवळीच्या सोबत लोकमत राहिले आहे. त्यामुळे प्रत्येक चळवळीला बळ मिळाले आणि प्रत्येक आंदोलन निर्णायक ठरू शकले. अलीकडच्या काळातसुद्धा नागपूर व अमरावती विद्यापीठाच्या नामांतराच्या लढ्यात लोकमतने महत्त्वाची भूमिका बजावल्याने दोन्ही विद्यापीठांची नामांतरे होऊ शकली. ज्या काळात समाजातील दुर्बल घटकांना स्वतचे हक्काचे व्यासपीठ नव्हते व त्यामुळे या दुर्बल घटकांचा आवाज शासनापर्यंत पोचू शकत नव्हता, त्या काळात त्यांच्यासाठी लोकमतने व्यासपीठ निर्माण केले. त्यामुळे दुर्बल घटकांना लोकमतचा आधार वाटू लागला. आपल्या समस्यांना लोकमतने वाचा फोडली तरच त्या सुटू शकतात असा विश्वास जनमतात निर्माण झाला.

हुंडाबळीची अनेक प्रकरणे लोकमतने प्रकाशात आणली. त्याअगोदर धनवान लोक अशी प्रकरणे दडपून टाकत होते. त्यांना वृत्तपत्रातून वाचा फोडण्याचे काम लोकमतने सर्वप्रथम केले. ग्रामीण भागातील दहावी व बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गाचा फायदा होत नव्हता. त्यांना तो मिळावा यासाठी लोकमतनेच सर्वप्रथम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शिका प्रसिद्ध करणे सुरू केले. त्याला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची प्रथा लोकमतनेच सुरू केली. आज सर्वच वृत्तपत्रे मार्गदर्शिका प्रसिद्ध करू लागली आहेत व गुणवंतांचा सत्कारदेखील करीत आहेत. पण त्याची सुरुवात करण्याचे श्रेय लोकमतलाच जाते. बालकांचा विकास व्हावा, त्यांच्यातील कलागुण, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी १९८० सालापासून लोकमतने बालमेळावा भरविण्यास सुरुवात केली. पं. नेहरूंच्या जयंतीचे औचित्य साधून बालकदिनानिमित्त हे बालमेळावे दरवर्षी मुलांसाठी चित्रस्पर्धा, विज्ञान मॉडेल प्रदर्शनी, एकलनृत्य, समूहनृत्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा असे विविध प्रकार या बालमेळाव्यात सादर होत. सतत १५ वर्षे हा उपक्रम राबविण्यात आला. नागपुरातील अनेक शाळा या उपक्रमात भाग घेत होत्या. त्यातूनच लोकमत ‘बालविकास मंच’ची निर्मिती होऊन बालकांसाठी नियमित कार्यक्रम होऊ लागले. मुलांना चांगले अक्षर काढण्यासाठी मार्गदर्शन, अभ्यासासाठी मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यक्रम, स्पर्धा परीक्षांची तयारी असे विविध उपक्रम लोकमत बालविकास मंचच्या माध्यमातून राबविण्यात येतात.

लोकमतचा दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे लोकमत सखी मंच. महिलांच्या प्रश्नांचा वाचा फोडावी यासाठी महिलांसाठी स्वतंत्र स्तंभ चालविण्याचे काम लोकमतने केले. सौ. मालती निमखेडकर, सौ. शुभांगी भडभडे, सौ. सीमा साखरे यांनी हे स्तंभ समर्थपणे चालवले. वाचकांची वाढती आवड लक्षात घेऊन ‘सखी’ नावाचा स्तंभ लोकमतच्या अंकात दररोज प्रसिद्ध होऊ लागला. त्यातूनच सखी मंच स्थापन करण्याची कल्पना आकारास आली. लोकमत सखी मंच संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून महिलांसाठी आरोग्य शिबिरापासून सहलींपर्यंत विविध उपक्रम सखी मंचतर्फे राबविण्यात येत असतात.

लोकमतचा आणखी एक लोकप्रिय उपक्रम आहे, लोकमत युवा मंच. युवकांचे स्वत:चे हक्काचे व्यासपीठ असावे या भूमिकेतून लोकमत युवा मंचची स्थापना करण्यात आली.

Web Title: Entrepreneurship of Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.