‘पोर्टल’मधील नोंदीने बिघडविले कोरोनाचे गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:08 AM2021-08-01T04:08:16+5:302021-08-01T04:08:16+5:30

नागपूर : जुलै महिन्यात ५२७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असताना ‘आयसीएमआर’ व ‘कोविड-१९’ या पोर्टलमधील नोंदींच्या गोंधळामुळे जुलै महिन्यात ...

The entries in the 'portal' spoiled Corona's math | ‘पोर्टल’मधील नोंदीने बिघडविले कोरोनाचे गणित

‘पोर्टल’मधील नोंदीने बिघडविले कोरोनाचे गणित

Next

नागपूर : जुलै महिन्यात ५२७ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असताना ‘आयसीएमआर’ व ‘कोविड-१९’ या पोर्टलमधील नोंदींच्या गोंधळामुळे जुलै महिन्यात एकाच दिवशी १५,३०६ रुग्ण व १,०७६ मृत्यूंची भर पडली. यामुळे कोरोनाचा आकड्याचे गणितच बिघडले. रुग्णांची संख्या वाढून १५,८३३, तर मृतांची संख्या १,०९१ वर पोहोचली.

नागपूर जिल्ह्यात जानेवारी ते जून महिन्यांच्या तुलनेत सर्वांत कमी रुग्ण व मृत्यूची नोंद जुलै महिन्यात झाली. जानेवारीमध्ये १०,५०७, फेब्रुवारीमध्ये १५,५१४, मार्चमध्ये ७६,२५०, एप्रिलमध्ये १,८१,७४९, मेमध्ये ६६,८१८ तर जूनमध्ये २,४४७ रुग्ण आढळून आले. सर्वाधिक, २२९० मृत्यूंची नोंद एप्रिल महिन्यात झाली. जुलै महिन्यात २,१३,४८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. पॉझिटिव्हिटीचा दर ७.४१ होता; परंतु ‘पोर्टल’मध्ये अचानक वाढलेले आकडे काढल्यास हाच दर ०.२४ टक्के येतो.

- कोरोनाच्या दुसरा लाटेची स्थिती

महिना : तपासलेले नमुने : रुग्ण : मृत्यू : पॉझिटिव्हिटीचा दर :

फेब्रुवारी : १,८१,४३५ : १५,५१४ : १७७ : ८.५५ टक्के

मार्च : ३,७९,१४३ :७६,२५० : ७६३ : २०.११ टक्के

एप्रिल : ६,५१,६३८ : १,८१,७४९ :२२९० : २७.८९ टक्के

मे : ५,२४,२२६ : ६६,८१८ : १५१४ : १२.७४ टक्के

जून : २,६६,८६१ :२,४४७ : १२३ : ०.९१ टक्के

जुलै : २,१३,४८४ : १५,८३३ : १०९१ : ७.४१ टक्के

Web Title: The entries in the 'portal' spoiled Corona's math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.