पर्यावरण मंत्र्यांनी दखल घेताच नांदगाव परिसरातील प्रदूषणाची तीव्रता घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 11:35 AM2022-02-09T11:35:01+5:302022-02-09T14:20:49+5:30

आदित्य ठाकरे यांनी नांदगांव ॲश पाँडमध्ये पाणीयुक्त राख टाकण्यात येत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाला तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

Environment Minister Aditya Thackeray has noticed that the intensity of pollution in Nandgaon area has reduced | पर्यावरण मंत्र्यांनी दखल घेताच नांदगाव परिसरातील प्रदूषणाची तीव्रता घटली

पर्यावरण मंत्र्यांनी दखल घेताच नांदगाव परिसरातील प्रदूषणाची तीव्रता घटली

Next
ठळक मुद्दे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी घेतली दखल

नागपूर : जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रामधून होणाऱ्या प्रदूषणाविषयीपर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेऊन हे प्रदूषण कमी करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निर्देश दिले. मंडळामार्फत यासंदर्भात अंमलबजावणी करण्यात आली असून पाणीयुक्त राख नांदगांव तलावात टाकण्यास निर्बंध घातल्याने या परिसरातील प्रदूषणाची तीव्रता कमी झाली आहे. अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.

पर्यावरण संरक्षण व आर्थिक विकास एकत्रितपणे होणे आवश्यक आहे. शाश्वत विकास तसेच भविष्यातील स्वच्छ व अक्षय उर्जेबाबत शासन आग्रही आहे. या उपाययोजना राज्यभरातील अशाच अन्य प्रकल्पांसाठीही केल्या जातील, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातून निर्माण होणारी राख नांदगांव येथील राखेच्या तलावात टाकण्यात येत असल्याने नांदगांव परिसरात जल व वायू प्रदूषणाची समस्या निर्माण झाल्याबाबत तक्रारी येत होत्या. या अनुषंगाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाजेनको, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांची ६ आणि १८ जानेवारी रोजी संयुक्त आढावा बैठक घेतली.

या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी नांदगांव ॲश पाँडमध्ये पाणीयुक्त राख टाकण्यात येत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाला तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राला नांदगांव तलावात राख टाकणे तत्काळ बंद करण्याबाबत १ फेब्रुवारी रोजी निर्देश बजावण्यात आले. या निर्देशांचे अनुपालन झाल्याबाबत महाजेनको, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राने ४ फेब्रुवारी रोजी कळविले असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

Web Title: Environment Minister Aditya Thackeray has noticed that the intensity of pollution in Nandgaon area has reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.