पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे नागपुरात हजारो झाडांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 08:54 PM2019-12-14T20:54:34+5:302019-12-14T20:56:32+5:30

बांधकाम व विकास प्रकल्पामुळे शहरातील वृक्षतोड वाढली आहे. परंतु त्याचवेळी महापालिकेने शहरातील प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर न करता गोवरी व मोक्षकाष्ठ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच हजारो झाडांना जीवदान मिळत आहे.

Environmental funerals bring life to thousands of trees in Nagpur | पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे नागपुरात हजारो झाडांना जीवदान

पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारामुळे नागपुरात हजारो झाडांना जीवदान

Next
ठळक मुद्देगोवऱ्या व मोक्षकाष्ठाचा वापर : नागपूर शहरातील नागरिकांचाही प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बांधकाम व विकास प्रकल्पामुळे शहरातील वृक्षतोड वाढली आहे. परंतु त्याचवेळी महापालिकेने शहरातील प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर न करता गोवरी व मोक्षकाष्ठ वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच हजारो झाडांना जीवदान मिळत आहे.
२०१३ मध्ये पर्यावरणपूरक पथदर्शी प्रकल्प म्हणून अंबाझरी घाटाची निवड करण्यात आली होती. सुरुवातीला या उपक्रमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु जनजागृती व नागरिकांची पर्यावरणाविषयीची जागरूक ता यामुळे हळूहळू या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद वाढत गेला. आता महापालिकेच्या अंबाझरी, मोक्षधाम, मानेवाडा व मानकापूर यासह प्रमुख दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी गोवरी व मोक्षकाष्ठ याचा वापर केला जात आहे. लाकडाचा वापर थांबल्याने हजारो वृक्षांना जीवनदान मिळाले आहे.
मनपातर्फे पर्यावरण रक्षणार्थ अनेक प्रयत्न करण्यात येतात. यात झाडे लावणे, झाडे जगवणे, नद्या स्वच्छ करणे, प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे, पर्यावरणपूरक दहनाची व्यवस्था आदींचा समावेश आहे. झाडे वाचविण्यासाठी शहरातील अंबाझरी व मोक्षधाम दहनघाटावर एलपीजी शवदाहिनी व गंगाबाई तसेच वैशालीनगर घाटावर शवदाहिनी लावलेली आहे. अन्य दहनघाटावर एलपीजी दाहिनी लावणे प्रस्तावित आहे. पाच दहनघाटावर शेणाच्या गोवऱ्या व मोक्षकाष्ठ यांचा उपयोग करून अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे.
७,२०० झाडांना जीवनदान
दर महिन्याला सुमारे ३०० अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक पद्धतीने केले जातात. नागपूर शहरात अंत्यसंस्कारासाठी मोक्षकाष्ठ व गोवऱ्यांचा वापर होत असल्याने दर महिन्याला १५ वर्षे वयाच्या सुमारे ६०० झाडांना जीवदान दिले जात आहे. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी १५ ते २० वर्षे वयाच्या दोन वृक्षांचा बळी जातो. त्यानुसार आता या शहरात एका महिन्यात सुमारे ६०० आणि एका वर्षात सुमारे ७,२०० झाडांना जीवदान मिळत आहे.
कोट्यवधी वृक्ष वाचतील
पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची पद्धत संपूर्ण राज्यात लागू झाली तर कोट्यवधी वृक्ष वाचवण्यात यश येईल. पर्यावरण संवर्धनाला मोठी मदत होणार आहे. महापालिकेने ही संकल्पना मांडली, परंतु नागरिकांनीही याला प्रतिसाद दिल्याने हा उपक्रम राबविणे शक्य झाले आहे.

Web Title: Environmental funerals bring life to thousands of trees in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.