महानिर्मितीच्या छत्तीसगड येथील गरेपालमा-२ प्रस्तावित कोळसा खाणीला पर्यावरण मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 10:48 AM2022-07-12T10:48:29+5:302022-07-12T10:51:44+5:30

रायगड जिल्ह्यातील घरगोंडा तहसील अंतर्गत गरेपालमा-२ हा कोळसा ब्लॉक असून या खाणीतून कोळसा थेट रेल्वे मार्गे महानिर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी आणि परळी वीज केंद्राला पाठविला जाणार आहे.

Environmental Sanction for Mahanirmiti proposed Gare Palma-2 coal mine in Chhattisgarh | महानिर्मितीच्या छत्तीसगड येथील गरेपालमा-२ प्रस्तावित कोळसा खाणीला पर्यावरण मंजुरी

महानिर्मितीच्या छत्तीसगड येथील गरेपालमा-२ प्रस्तावित कोळसा खाणीला पर्यावरण मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्दे२५८३.४८ हेक्टर परिसरात कोळसा ब्लॉकची क्षमता

नागपूर : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयाने ११ जुलै रोजी महानिर्मितीच्या छत्तीसगड येथील गरेपालमा-२ प्रस्तावित कोळसा खाणीला पर्यावरण मंजुरी दिली आहे.

सुमारे २५८३.४८ हेक्टर परिसरातील या कोळसा ब्लॉकची क्षमता २२ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष खुल्या खदानीतून तर १.६ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष भूमिगत खदाणीची आहे. रायगड जिल्ह्यातील घरगोंडा तहसील अंतर्गत गरेपालमा-२ हा कोळसा ब्लॉक असून या खाणीतून कोळसा थेट रेल्वे मार्गे महानिर्मितीच्या चंद्रपूर, कोराडी आणि परळी वीज केंद्राला पाठविला जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येकी ५०० मेगावाॅट क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र संच क्रमांक ८ व ९ (१००० मेगावाॅट), कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रत्येकी ६६० मेगावाॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८,९ व १० (१९८० मेगावाॅट) आणि परळी औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावाॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८ (२५० मेगावाॅट) असे एकूण ३२३० मेगावाॅट क्षमतेच्या वीज उत्पादनासाठी या कोळशाचा वापर होणार आहे. या प्रकल्पाद्वारे सुमारे ३,४०० रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

कोळशाचा साठा अपुरा; पुन्हा वीजटंचाईचे ढग

या कोळसा प्रकल्पाची पर्यावरण विषयक जनसुनावणी सप्टेंबर २०१९ मध्ये झाली असून वन मंजुरी टप्पा-१ आणि पर्यावरण मंजुरी प्राप्त झाली असून आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत वन मंजुरी टप्पा-२ अपेक्षित आहे. त्यानंतर जमीन अधिग्रहण प्रक्रियेला सुरुवात होणार असून साधारणत: सन २०२३ मध्ये प्रत्यक्ष खाण उत्खननास प्रारंभ होईल असे महानिर्मितीकडून सांगण्यात आले आहे.

Read in English

Web Title: Environmental Sanction for Mahanirmiti proposed Gare Palma-2 coal mine in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.