संविधानामुळेच देशात समानता : महापौर नंदा जिचकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:54 PM2018-11-26T22:54:40+5:302018-11-26T22:55:30+5:30
भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता व एकात्मता अखंडता टिकून आहे, त्यामुळे संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, भारतीय संविधानामुळेच देशात समानता नांदत असल्याचे मनोगत महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता व एकात्मता अखंडता टिकून आहे, त्यामुळे संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, भारतीय संविधानामुळेच देशात समानता नांदत असल्याचे मनोगत महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी केले.
संविधान दिनानिमित्त महापालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात महापौर बोलत होत्या. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, सभापती स्थायी अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजित बांगर, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, विधी समिती सभापती धर्मपाल मेश्राम आदी उपस्थित होते.
उपस्थितांनी भारतीय घटनेचि शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर महापौरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुध्दा संविधान उद्देशिकेचे सामूहिकरीत्या वाचन केले.
महापौर म्हणाल्या, आज संविधानाबाबत जागृती होणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपणाला संविधानाने बहाल केलेले हक्क कळणार नाहीत. तोपर्यंत आपल्याला लोकशाहीचा खरा अर्थही कळू शकणार नाही. आपल्या भारताचे संविधान कोणा एका व्यक्ती अथवा संस्था अथवा धार्मिक बाबीला अर्पण न करता देशातील प्रत्येक नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आले आहे.
अपर आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, नितीन कापडनीस, रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, अधिक्षक अभियंता मनोज तालेवारी, कार्य. अभियंता गिरीश वासनिक, संजय जैस्वाल, सतीश नेरळ, अविनाश बाराहाते, अमिन अख्तर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, स्थावर अधिकारी उज्वल धनविजय, पशुचिकित्सा अधिकारी गजेन्द्र महल्ले, सहा.जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राष्ट्रीय नागपूर कॉपोर्रेशन एम्प्लॉईजचे अध्यक्ष सुरेन्द्र टिंगणे, राजेश हातीबेड, मनपा मागासवर्गीय संघटनेचे दिलीप तांदळे, विनोद धनविजय, राजकुमार वंजारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.
शाळा व झोन कार्यालयात संविधान दिनाचे आयोजन
भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी, यादृष्टीने महापालिकेच्या सर्व शाळा व झोन कार्यालयामध्ये संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून सर्व शाळांमध्ये व झोन कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच शाळा व झोन परिसरात संविधान रॅली, निबंध स्पर्धा, संविधान लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते.
नासुप्रत संविधान प्रस्तावनेचे वाचन
भारतीय संविधान दिनानिमित्त नासुप्र कार्यालयात आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून हा दिवस साजरा करण्यात आला. अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार, कार्यकारी अधिकारी प्रशांत भांडारकर, जनसंपर्क व सचिव-१ कल्पना गीते, इमारत अभियंता(उत्तर) ललित राऊत, सचिव-२ विजय पाटील, विभागीय अधिकारी(दक्षिण) अविनाश बडगे, आस्थापना अधिकारी योगीराज अवधूत तसेच नासुप्रचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.