नागपुरातील एअर इंडिया एमआरओच्या त्रुटींवर भडकले सीएमडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 09:19 PM2018-11-05T21:19:01+5:302018-11-05T21:20:57+5:30

मिहान येथील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये असलेल्या अनेक त्रुटींबाबत एअर इंडियाचे अध्यक्ष व प्रबंध निदेशक प्रदीप सिंह खरोला यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. एमआरओमध्ये मानव संसाधनांची कमतरता आणि अनेक विमानांच्या चेक्स अप्रुव्हलचा अभाव यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Error in Air India's MRO in Nagpur The CMD provoked | नागपुरातील एअर इंडिया एमआरओच्या त्रुटींवर भडकले सीएमडी

नागपुरातील एअर इंडिया एमआरओच्या त्रुटींवर भडकले सीएमडी

Next
ठळक मुद्देएअरलाईन्सच्या सिटी बुकिंग आॅफिसलाही दिली ताकीद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहान येथील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये असलेल्या अनेक त्रुटींबाबत एअर इंडियाचे अध्यक्ष व प्रबंध निदेशक प्रदीप सिंह खरोला यांनी अधिकाऱ्यांना फटकारले. एमआरओमध्ये मानव संसाधनांची कमतरता आणि अनेक विमानांच्या चेक्स अप्रुव्हलचा अभाव यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
खरोला रविवारी दुपारी दिल्लीवरून इंडिगोच्या फ्लाईटने नागपूरला पोहोचले. नागपुरात येताच त्यांनी एमआरओची पाहणी केली. ते जवळपस दोन तास एमआरओमध्ये होते. या दरम्यान त्यांनी अधिकऱ्यांना उपलब्ध संसाधनांबाबत विचारपूस केली. उपकरणांची पाहणी केली आणि शेड्युलच्या विषयाबाबतही माहिती जाणून घेतली. एमआरओमध्ये सध्या ६० टेक्निशियन आहेत. यात जवळपास ५० टक्के कमी आहेत. याशिवाय बोर्इंग ७३७ फॅमिलीचे सर्व विमानांचे सर्व चेक्स अद्याप उपलब्ध नाहीत. एअरबसच्या देखरेखीचे अप्रुवलही अजूनपर्यंत मिळवायचे आहे. याविषयावर अधिकारिकपणे कुणीही माहिती दिली नाही, परंतु सूत्रानुसार सीएमडी एमआरओमधील या त्रुटींबाबत अधिकाऱ्यांवर भडकले. दुसरीकडे आवश्यक प्रस्तावांना तातडीने मुख्यालयाकडे पाठविण्याचे निर्देश दिले. करारानुसार एमआरओमध्ये स्पाईसजेट एअरलाईन्सच्या विमानांची देखभालही जानेवारी २०१९ पासून करायची आहे. अशा परिस्थितीत एमआरओमधील कर्मचाऱ्यांची कमतरता व त्रुटी पाहता अनेक प्रश्न उपस्थित होतात.
एमआरओची पाहणी केल्यानंतर खरोला एअर इंडियाच्या सिटी बुकिंग आॅफिसमध्ये पोहोचले. तिथेही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आवश्यक निर्देश दिले.

Web Title: Error in Air India's MRO in Nagpur The CMD provoked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.