ट्रायल घेण्याच्या बहाण्याने कार घेऊन पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 09:46 PM2023-06-28T21:46:18+5:302023-06-28T21:46:39+5:30

Nagpur News झूम कार ॲपवरून कारची बुकिंग करून ट्रायल घेण्याच्या बहाण्याने कारची चावी घेऊन तीन आरोपींनी कार पळविली.

Escaping with a car on the pretext of taking a trial | ट्रायल घेण्याच्या बहाण्याने कार घेऊन पलायन

ट्रायल घेण्याच्या बहाण्याने कार घेऊन पलायन

googlenewsNext

नागपूर : झूम कार ॲपवरून कारची बुकिंग करून ट्रायल घेण्याच्या बहाण्याने कारची चावी घेऊन तीन आरोपींनी कार पळविली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २५ ते २७ मेदरम्यान घडली आहे. शुभम रमेश ठाकरे (वय २७, रा. झेंडा चौक झिंगाबाई टाकळी), विक्की जयस्वाल (रा. नागपूर) आणि सलमान (रा. अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी यश दत्तात्रय ओढेकर (वय ३४, रा. हिरणवार ले-आऊट, जयताळा) यांच्या पत्नीच्या नावे असलेली कार क्रमांक (एमएच ३१ एफयू १५०१) किंमत सहा लाख रुपये या कारसाठी झूम कार ॲपद्वारे संपर्क करून कार बुक केली. आरोपी शुभमने यश यांच्याकडून कारची चावी घेऊन ट्रायल घेण्याच्या बहाण्याने कार घेऊन गेला. तिन्ही आरोपींनी कार परत न करता फसवणूक केली. यश ओढेकर यांच्या तक्रारीवरून एमआयडीसीचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत साबळे यांनी आरोपींविरुद्ध कलम ४२०, ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Escaping with a car on the pretext of taking a trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.