४० टक्के औषधांवर कामगार रुग्णालयाचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:19 AM2018-07-06T01:19:45+5:302018-07-06T01:22:26+5:30
औषधांचा तुटवडा, अद्ययावत सोर्इंचा अभाव, रिक्त पदे, डॉक्टरांअभावी बंद पडलेले वॉर्ड यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाकडून (इएसआयसी) रुग्णांची हेळसांड होत आहे. याला घेऊन राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद व योजनेचे संचालक डॉ. राजीव स्वामी यांनी गुरुवारी रुग्णालयाला भेट दिली. या भेटीत त्यानी ४० टक्के औषधे रुग्णालयात असल्याचे सांगितले, परंतु प्रत्यक्षात साध्या तापाचे औषधही मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : औषधांचा तुटवडा, अद्ययावत सोर्इंचा अभाव, रिक्त पदे, डॉक्टरांअभावी बंद पडलेले वॉर्ड यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाकडून (इएसआयसी) रुग्णांची हेळसांड होत आहे. याला घेऊन राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद व योजनेचे संचालक डॉ. राजीव स्वामी यांनी गुरुवारी रुग्णालयाला भेट दिली. या भेटीत त्यानी ४० टक्के औषधे रुग्णालयात असल्याचे सांगितले, परंतु प्रत्यक्षात साध्या तापाचे औषधही मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.
कामगारांचे आरोग्य सांभाळले जावे यासाठी नागपुरात कामगार विमा रुग्णालय स्थापन करण्यात आले. या कामगारांकडून वर्षाला कोट्यवधी रुपये रुग्णालयाला मिळतात. परंतु शासन या रुग्णालयाकडे लक्ष देत नसल्याने रुग्णांसोबतच रुग्णालय प्रशासनाला करावे काय, हा प्रश्न पडला आहे. रुग्णालात गेल्या तीन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा आहे. केवळ आकस्मिक औषधे खरेदी करून कसेतरी रुग्णालय चालविले जात आहे. ५० टक्के पदे रिक्त आहेत. पद भरती होत नसल्याने वरिष्ठ डॉक्टरांच्या सेवानिवृत्ती व स्वेच्छानिवृत्तीमुळे एक-एक वॉर्ड बंद होत आहेत. अद्ययावत यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णांना दुसºया रुग्णालयात पाठविले जात आहे. यातही संबंधित रुग्णालयाचे देयके प्रलंबित ठेवली जात असल्याने खासगी रुग्णालये आपली सेवा देणे बंद करीत आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे. उपचारासाठी वेतनामधून पैसा कपात होऊनही उपचार मिळत नसल्याने त्यांचा संताप समोर येऊ लागला आहे. येथील डॉक्टर-रुग्णांच्या संबंधामध्ये कटुता आली आहे. ‘लोकमत’ने या समस्यांना घेऊन वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्तावर विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला. याला घेऊन आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद व संचालक डॉ. राजीव स्वामी यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी विविध उपाययोजना सुचविल्या असल्यातरी याचा तातडीने फायदा रुग्णांना किती होणार हा प्रश्न आहे.