अत्यावश्यक सेवा, बस वाहतूक सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:08 AM2021-04-15T04:08:07+5:302021-04-15T04:08:07+5:30
शहरात १ मे पर्यंत संचारबंदी : मनपा आयुक्तांचे आदेश नागपूर : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करून परिस्थिती नियंत्रणात ...
शहरात १ मे पर्यंत संचारबंदी : मनपा आयुक्तांचे आदेश
नागपूर : कोरोना संसर्गाची साखळी खंडित करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रोलपंप, सार्वजनिक वाहतूक, रिक्षा-टॅक्सी, उपनगरीय रेल्वे, आरोग्य सेवा सुरू राहतील. परंतु सबळ कारणांशिवाय कोणालाही रस्त्यावर फिरता येणार नाही वा खासगी वाहने रस्त्यावर आणता येणार नाहीत. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूर शहरासाठी संचारबंदीसंदर्भात बुधवारी आदेश जारी केले.
....
हे बंद राहणार
-अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने
- शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवण्या
- उपाहारगृहे, बार
- उद्याने, क्रीडा संकुल, व्यायामशाळा
-चित्रपटगृहे, नाट्यगृहे
-वॉटर पार्क
- मॉल्स, व्यापार संकुल
-धार्मिक स्थळे
-केशकर्तनालये, स्पा, ब्युटीपार्लर
.......
हे राहणार सुरू...
- जीवनावश्यक सेवांची दुकाने, त्याच्याशी निगडित वाहतूक व सुविधा
- अत्यावश्यक उद्योग-सेवा
- आपली बस वाहतूक, रेल्वे सेवा, रिक्षा- टॅक्सी
- रुग्णालये आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सर्व सेवा-उद्योग
- विमा-बँका आणि इतर वित्तीय सेवा, ई-कॉमर्स सेवा
- पेट्रोल पंप, आयटी सेवा, मालवाहतूक
-उपाहारगृहांत बसून खानपान नाही. पण त्यांना दिवसभर घरपोच सेवा सुरू
- रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांनाही दिवसभर पार्सल सेवा देता येईल.
- दारू घरपोच मागवता येईल.
- आवश्यक सेवेतील उद्योग-निर्यात पूर्ण क्षमतेने सुरू राहील.