बाबासाहेब व महास्थवीर चंद्रमणींच्या अस्थिकलशाची स्थापना ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:07 AM2021-07-25T04:07:38+5:302021-07-25T04:07:38+5:30
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महास्थवीर चंद्रमणी यांच्या अस्थीची भारतीय सत्धम्म बुद्धविहार येथे चांदीच्या कलशात पुनर्स्थापना करण्यात आली. ...
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महास्थवीर चंद्रमणी यांच्या अस्थीची भारतीय सत्धम्म बुद्धविहार येथे चांदीच्या कलशात पुनर्स्थापना करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब व त्यांना धम्मदीक्षा देणारे चंद्रमणी यांच्या अस्थी एकाच विहारात असण्याचा हा ऐतिहासिक प्रसंग असल्याची भावना दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी व्यक्त केली.
विहारात झालेल्या कार्यक्रमात भिक्षू संघ आणि उपासक-उपासिका उपस्थित होत्या. तत्पूर्वी सकाळी भंते नागवंश यांच्या हस्ते सुत्तपठन आणि परित्राण पाठ घेण्यात आले. विहार समितीचे अध्यक्ष डी. एम. बेलेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या विहाराचे बांधकाम सुरू असताना येथील अस्थी भदंत ससाई यांच्या निवासस्थानी सुरक्षित ठेवण्यात आल्या. विहाराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अस्थिकलश पुनर्स्थापित करण्यात आले. समूहघोष सामाजिक संस्थेतर्फे चांदीचे दोन कलश (दीड किलोचे) दान स्वरूपात देण्यात आले, ज्यामध्ये अस्थी ठेवण्यात आल्या. यावेळी एस.के. गजभिये यांच्यासह विहार समितीचे सचिव राजकुमार मेश्राम, निरंजन वारकर, धरमदास मेश्राम, जगेश मेश्राम, रवि मंडाले, कल्पना द्रोणकर, रेखा वानखेडे, भंते नागसेन, भंते नागानंद, भंते धम्मबोधी, भंते आनंद, भंते धम्मदीप, संघप्रिया उपस्थित होत्या. संचालन भंते नागवंश, राजकुमार मेश्राम यांनी केले. वर्षा धारगावे यांनी आभार मानले.