राज्यात सात अतिउच्च दाब उपकेंद्रांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 09:47 PM2017-12-30T21:47:34+5:302017-12-30T21:52:22+5:30

राज्याच्या महापारेषण कंपनीने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षभराच्या काळात राज्यात ७ नवीन अतिउच्च दाब उपकेंद्रे उभारली असून अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रांमध्ये १४६० एमव्हीएची क्षमता वाढविली आहे तसेच वर्षभरात ८७५ किमीच्या नव्या वाहिन्या उभारल्या.

Establishment of seven high tention sub-stations in the state | राज्यात सात अतिउच्च दाब उपकेंद्रांची उभारणी

राज्यात सात अतिउच्च दाब उपकेंद्रांची उभारणी

googlenewsNext
ठळक मुद्दे८७५ किमीच्या नव्या वाहिन्या :महापारेषणचे महत्त्वाचे निर्णय

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राज्याच्या महापारेषण कंपनीने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात गेल्या वर्षभराच्या काळात राज्यात ७ नवीन अतिउच्च दाब उपकेंद्रे उभारली असून अस्तित्वात असलेल्या उपकेंद्रांमध्ये १४६० एमव्हीएची क्षमता वाढविली आहे तसेच वर्षभरात ८७५ किमीच्या नव्या वाहिन्या उभारल्या.
मनोरा आणि तारांच्या खालील जमिनीचा मोबदला देण्याबाबतच्या धोरणाला शासनाने मंजुरी दिली. शेतकºयांना जमिनीचा मिळणाऱ्या मोबदल्यात आता वाढ करण्यात आली आहे. भारनियमन टाळण्यासाठी ट्रान्सफार्मर क्षमता वाढीच्या योजनांना मंजुरी देण्यात आली. २०१७-१८ मध्ये २९ उपकेंद्रात २५२५ एमव्हीए क्षमतावाढीची कामे सुरू आहेत. वर्षभराच्या काळात १९ अतिउच्च दाब वाहिन्यांचे दुसरे परिपथ उभारण्याच्या योजनेस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे उपकेंद्रांना नवीन पर्यायी स्रोत उपलब्ध होणार आहेत.
अतिउच्च दाब वाहिन्यांचे ओव्हरलोडिंग टाळण्यासाठी एचटीएलएस कंडक्टरचा वापर करून ५२० किमीच्या वाहिन्या उभारण्याच्या सहा योजनांना मंजुरी देण्यात आली. महावितरणला योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी २९८० एमव्हीआर क्षमतेची कपॅसिटर बँक उभारण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. या कामांपैकी बहुतेक कामे पूर्ण झाली आहेत. तसेच वीजदाबाच्या योग्य नियमनासाठी महापारेषणने ४०० केव्ही उपकेंद्रांमध्ये १२५ एमव्हीएआर क्षमतेचे १२ शंट रिअ‍ॅक्टर उभारण्याच्या योजनेलाही मंजुरी दिली आहे. या योजनेचा खर्च १४० कोटी रुपये आहे.
महापारेषणने इस्रोच्या सहकार्याने भौगोलिक माहिती प्रणाली विकसित केली आहे. याद्वारे अस्तित्वात असलेली पारेषण उपकेंद्रे, मनोरे यांची माहिती एका क्लीकवर आॅनलाईन उपलब्ध झाली आहे. त्यामुळे भविष्यात नवीन वाहिनी अथवा उपकेंद्र उभारतेवेळी सध्याची माहिती उपयुक्त ठरणार आहे.

 

 

 

Web Title: Establishment of seven high tention sub-stations in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.