गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागपुरात  बाजारपेठामध्ये योजनांची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:34 AM2018-03-17T00:34:22+5:302018-03-17T00:38:41+5:30

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी सर्वच बाजारपेठामध्ये १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

In the eve of Gudhipadwa, there are tremendous schems in the market | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागपुरात  बाजारपेठामध्ये योजनांची धूम

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागपुरात  बाजारपेठामध्ये योजनांची धूम

Next
ठळक मुद्दे १०० कोटींची उलाढाल होणार : सोने, दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्यासाठी बाजारपेठेत विविध आॅफर्सची रेलचेल आहे. ग्रॅम सोन्यापासून ते स्वप्नातील घर, गृहोपयोगी वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. नवीन घराची नोंदणी वा गृहप्रवेश याच दिवशी केला जातो. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी सर्वच बाजारपेठामध्ये १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
सोने खरेदीत उत्साह
गुढीपाडवा सण बाजारपेठेकरिता एक सोहळाच असतो. शुभ कामाची सुरुवात याच दिवसापासून करण्यात येते. याहूनही अधिक म्हणजे समृद्धी राहावी, यासाठी लोकांचा ग्रॅम सोन्यापासून खरेदीवर भर असतो. अनेकजण लग्नाचे दागिनेही याच दिवशी खरेदी करतात. चांदीचे भांडे खरेदीसाठी उत्साह असतो. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर ३१,५०० रुपयांवर स्थिरावले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये खरेदीसाठी प्रचंड उत्साह आहे. नवीन दागिना खरेदी करण्याची प्रत्येकाची मानसिकता असते. त्यामुळे या दिवशी नेहमीपेक्षा चार-पाचपट व्यवसाय असतो. सर्व सराफा शोरूम गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी सज्ज आहे. सोने-चांदी ओळ कमिटीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांनी सांगितले की, ठोक व्यापाऱ्यांकडे सराफा दुकानदारांकडून सोन्याची जास्त मागणी असल्यामुळे यावर्षी सोन्याच्या दागिन्यांना चांगला उठाव राहील. लहान व्यापाऱ्यांकडे बुकिंग चांगले आहे. प्रत्येक सराफा १०० ते २०० ग्रॅम सोने खरेदी करीत आहेत. नागपुरात लहानमोठ्या १५०० पेक्षा जास्त सराफा व्यावसायिक आहेत. त्यात १५० पेक्षा जास्त मोठ्या शोरूमचा समावेश आहे. गुढीपाडव्याला १५० किलोपेक्षा जास्त सोन्याची विक्री होण्याची अपेक्षा आहे.
आॅटोमोबाईल क्षेत्रात आधी बुकिंग, नंतर खरेदी
मारुती, टाटा, टोयोटा, होंडा, ह्युंडई, रेनॉर्ड, फोर्ड जनरल मोटर्स, अशोक लेलँड या कंपनीच्या प्रवासी वाहनांसह व्यावसायिक वाहनांवर आकर्षक सूट देण्यात येत आहे. ग्राहकांनी पूर्वीच बुकिंग केलेल्या विविध कंपन्यांच्या दुचाकी वाहनांची डिलेव्हरी या दिवशी मिळेल. टीव्हीएस बाईक व स्कूटर, होंडा, बजाज, यामाहा, बजाज, हिरो या कंपन्यांनी विविध आकर्षक योजना सादर केल्या आहेत. शिवाय ग्राहकांच्या स्वागतासाठी शोरूमची आकर्षक सजावट केली आहे. बाजारपेठामध्ये उत्साह असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सर्वच कंपन्यांच्या वाहनांना मागणी आाहे. पण त्यात होंडा, हिरो, टीव्हीएस या कंपन्यांची दुचाकी आणि मारुती, ह्युंडई, टाटा, होंडा या कंपन्यांच्या कारचे जास्त बुकिंग झाले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रत उत्साह
गुढीपाडव्याला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रत उत्साहाचे वातावरण आहे. या शुभमुहूर्तावर अनेक कंपन्यांनी आकर्षक ऑफर दाखल केल्या आहेत. खरेदीसाठी वित्तीय संस्थांकडून शून्य टक्के योजना आहे. सोनी, सॅमसंग, एलजी, गोदरेज, इन्टेक्स, ओनिडा, आयएफबी, व्हिडिओकॉन, एचपी, डेल, लेनोवो, डायकीन, पॅनासोनिक कंपन्यांनी एलईडी, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लॅपटॉप, कॅमेरा, हॅण्डीकॅम, स्मार्टफोन, किचन चिमणी, मिक्सर, फूड प्रोसेसर, आयर्न, इंडक्शन, शेगडी, गिझ, राईस कुकर, आटा चक्की यासारखी आधुनिक उत्पादने प्रदर्शित केली आहेत. या दिवशी खरेदी करणा:यांना आर्थिक फायदा होणार आहे.
 

Web Title: In the eve of Gudhipadwa, there are tremendous schems in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.