नागपुरात श्री गुरूनानक प्रकाशपर्वावर कलगीधर सत्संग मंडळातर्फे शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:38 AM2019-11-13T00:38:55+5:302019-11-13T00:40:27+5:30

श्री गुरू नानकदेव यांच्या ५५०व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने श्री कलगीधर सत्संग मंडळाच्या वतीने जरिपटका येथे शोभायात्रा काढण्यात आली.

On the eve of Shri Gurunanak Prakash Parva Kalgidhar Satsang's procession | नागपुरात श्री गुरूनानक प्रकाशपर्वावर कलगीधर सत्संग मंडळातर्फे शोभायात्रा

नागपुरात श्री गुरूनानक प्रकाशपर्वावर कलगीधर सत्संग मंडळातर्फे शोभायात्रा

Next
ठळक मुद्दे ‘ गुरू श्री ग्रंथ साहिब’च्या दर्शनासाठी उसळली गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री गुरू नानकदेव यांच्या ५५०व्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने श्री कलगीधर सत्संग मंडळाच्या वतीने जरिपटका येथे शोभायात्रा काढण्यात आली.
विधिवत पुजनानंतर गुरू श्री ग्रंथ साहिबची प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर शोभायात्रेस सुरुवात झाली. यात्रेत अग्रस्थानी गुरू श्री ग्रंथ साहिबचा रथ होता. ग्रंथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली. शोभायात्रेत श्री गुरू नानकदेव, श्री गुरू अंगददेव, श्री गुरू अमरदास, श्रीगुरू रामदास, श्री गुरू अरजनदेव, श्री गुरू हरगोविंद, श्री गुरू हरिराय साहिब, श्री गुरू हरिक्रिशनदेव, श्री गुरू तेगबहाद्दूर, श्री गुरू गोबिंदसिंग, माता भगवतीचे रथ होते. ढोलताशाच्या गजरात नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेचे संयोजक अधिवक्ता माधवदास ममतानी यांच्या नेतृत्त्वात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, एसीपी परशूराम, डीसीपी निलोत्पल, माजी आ. डॉ. मिलिंद माने, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, आरोग्य विभागचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, नगरसेवक महेंद्र धनविजय, उदय भास्कर नायर, राजे मुधोजी भोसले, हेमंत गडकरी, जयप्रकाश गुप्ता, डॉ. विंकी रूघवानी, पीआय पराग पोटे, रमेश वानखेडे, किशोर ललवानी यांच्यासह शहरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

ठिकठिकाणी झाला पुष्पवर्षाव
 शोभायात्रा दुपारी १ वाजता मंडळाच्या सभागृहातून निघाली. यात्रा मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांकडून पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. प्रसाद वितरण, रांगोळीने केलेल्या मार्गाचे सुशोभीकरण, स्वागत द्वार आणि जागोजागी करण्यात आलेल्या आतषबाजीने वातावरणात जल्लोष निर्माण झाला होता.

Web Title: On the eve of Shri Gurunanak Prakash Parva Kalgidhar Satsang's procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.