आंदोलन उधळल्यावरही विदर्भवाद्यांनी पुन्हा मांडला ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:10 AM2021-08-12T04:10:50+5:302021-08-12T04:10:50+5:30
नागपूर : ... परवानगीवरून वाद या आंदोलनाला परवानगी नसल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. कालही ...
नागपूर : ...
परवानगीवरून वाद
या आंदोलनाला परवानगी नसल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. कालही पहिल्या दिवशी पोलिसांनी आंदोलकांना उठविण्याचा प्रयत्न केला होता. ठिय्या दिलेल्या मार्गावरून वाहन चालविण्याचाही पोलिसांनी प्रयत्न केला होता. मात्र कार्यकर्त्यांची अधिक संख्या असल्याने व आंदोलक उत्साहात असल्याने काल ही कारवाई टाळली होती. आज सकाळी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी धरपकड केली.
...
आम्ही परवानगी मागितली होती - नेवले
या संदर्भात ‘लोकमत’कडे दिलेल्या प्रतिक्रियेत संयोजक राम नेवले म्हणाले, ६ ऑगस्टला आम्ही तहसील पोलिसांकडे रीतसर अर्ज करून आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र आंदोलनाचा दिवस उगवूनही परवानगी देण्याचे पोलिसांनी जाणीवपूर्वक टाळले. त्यामुळे आम्ही नियोजत घोषणेनुसार आंदोलन केले. ते १५ ऑगस्टपर्यंत सुरूच राहील. विदर्भ चंडिका मंदिराला विदर्भ लढ्याचा इतिहास आहे. त्यामुळे हे आंदोलन येथूनच होईल.
...
आंदोलन पुन्हा सुरू
पोलीस ठाण्यातून बाहेर पडून आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत शहीद चौकाकडे कूच केले. दरम्यान, टांगा चौकात सुमारे पाऊण तास ठिय्या देऊन घोषणाबाजी केली. त्यानंतर पुन्हा शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिरात पोहोचून ठिय्या आंदोलन सुरू केले. ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते. यावेळी मात्र रस्त्यावर ठिय्या न देता आंदोलकांनी मंदिराच्या प्रांगणात ठिय्या दिल्याने कालच्यासारखा वाहतुकीला व व्यापाऱ्यांना अडथळा झाला नाही.
....
महिला आंदोलकांनाही ओढत नेले
आंदोलन सुरू होण्याच्या निर्धारित वेळी कार्यकर्ते पोहचत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. मुकेश मासुरकर व इतर आंदोलनकर्त्यांना जबरदस्तीने ओढत नेत व्हॅनमध्ये बसवून तहसील पोलीस स्टेशनला नेले. महिला कार्यकर्त्यांनाही मनगटाला धरून जबरदस्तीने फरफटत ओढत नेले. दिव्यांग महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उषा लांबट यांच्या हाताला आणि पायाला खरचटले. महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे यांच्याशी झालेल्या झटापटीत त्यांचेही कपडे फाटले.
...