चार महिन्यानंतरही मराठी विद्यापीठाची घोषणा हवेत; श्रीपाद जोशींचे उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षणमंत्र्यांना स्मरणपत्र

By निशांत वानखेडे | Published: July 8, 2023 05:47 PM2023-07-08T17:47:40+5:302023-07-08T17:48:32+5:30

रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली

Even after four months, Marathi University still wants to announce; Shripad Joshi's Memorandum to Dy CM, Higher Education Minister | चार महिन्यानंतरही मराठी विद्यापीठाची घोषणा हवेत; श्रीपाद जोशींचे उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षणमंत्र्यांना स्मरणपत्र

चार महिन्यानंतरही मराठी विद्यापीठाची घोषणा हवेत; श्रीपाद जोशींचे उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षणमंत्र्यांना स्मरणपत्र

googlenewsNext

नागपूर : राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाच्या स्थापनेची घाेषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र चार महिने उलटूनही त्याबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाही. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयाेजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उपमुख्यमंत्री, तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना चौथे स्मरणपत्र पाठविले आहे.

रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली. विद्यापीठाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी पंधरा दिवसांच्या आत तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र घोषणेला चार महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील अद्यापपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन न केल्याबद्दल श्रीपाद जोशी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यासंदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री, तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांना चौथे स्मरणपत्र पाठविले.

मराठी विद्यापीठ स्थापनेसाठी अशासकीय तज्ज्ञ समिती स्थापन करावी, यासाठी आम्ही सातत्याने गेली अनेक वर्षे शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. संबंधित अशासकीय तज्ज्ञ समितीची पंधरा दिवसांच्या आत स्थापनेची घोषणादेखील आपण केली होती. तज्ज्ञांची समिती पंधरा दिवसांत नेमण्याची शासनाने तिसरी घोषणा करूनही सुमारे ४ महिने होत झाले असले, तरी संबंधित शासन निर्णय अद्याप निर्गमित झालेला नाही. याकडे आपले पुन्हा लक्ष वेधीत आहोत. ही समिती आम्ही विनंती केलेल्या संस्थात्मक सहभागासह नेमली जावी, याचे पुन्हा स्मरणही करून देत आहोत, असे श्रीपाद जोशी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Even after four months, Marathi University still wants to announce; Shripad Joshi's Memorandum to Dy CM, Higher Education Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.