लसीकरणानंतरही ५२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:04+5:302021-07-02T04:07:04+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : लसीकरणानंतरही काही जण पॉझिटिव्ह येत आहेत. याचे प्रमाण मात्र कमी आहे. एकट्या मेडिकलमध्ये पहिला आणि ...

Even after vaccination, 52 patients tested positive for corona | लसीकरणानंतरही ५२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

लसीकरणानंतरही ५२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : लसीकरणानंतरही काही जण पॉझिटिव्ह येत आहेत. याचे प्रमाण मात्र कमी आहे. एकट्या मेडिकलमध्ये पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये ५२ रुग्ण पॉझिटिव्ह आले असले तरी चिंतेचे कारण नाही. लस प्रभावी असल्यामुळेच यातील बहुसंख्य रुग्ण रुग्णालयात भरती होण्यापासून तसेच कोरोनामुळे मृत्यू ओढावण्यापासून वाचल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोना लस ही कोरोनापासून शंभर टक्के बचावाचा दावा करत नाही. यामुळे लस घेऊनही कोरोना संक्रमण होण्याची शक्यता असते. यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या लसीकरणामधून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची आकडेवारी आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. परंतु मेडिकलच्या स्वत:च्या आकडेवारीनुसार लसीकरणानंतर फार कमी जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

-दुसऱ्या डोसनंतर आठ पॉझिटिव्ह

कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर आतापर्यंत नऊ तर, याच लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये सहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. कोविशिल्डचा पहिला डोस घेणाऱ्यांमध्ये ३३ तर दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये दोन जण पॉझिटिव्ह आले आहेत. एकूणच पहिल्या डोसनंतर सर्वाधिक ४२ तर दुसऱ्या डोसनंतर आठ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. ही संख्या मेडिकलमध्ये येऊन उपचार घेतलेल्या रुग्णांची आहे.

-लसीकरणानंतर या लक्षणांकडे लक्ष द्या

तज्ज्ञानुसार, कोरोनाची लस टोचल्यानंतर सातत्याने शिंका येत असतील, लस घेतल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छाती जड झाल्यासारखे वाटत असेल, कानाच्या आत दुखत असेल आणि थंडी वाजून येत असेल, किंवा तुमच्या गळ्याभोवती सूज जाणवत असेल, त्या ठिकाणी दुखत असेल, दोन दिवसांच्या वर ताप असेल तर सावध व्हायला हवे. कोरोनाची चाचणी करायला हवी.

-कोरोनाची गंभीरता टाळण्यासाठी लसीकरण हाच पर्याय

लसीकरणानंतर पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. जे पॉझिटिव्ह आले त्यांच्यातील फार कमी रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याची वेळ येते. मृत्यूचा धोकाही कमी होता. यामुळे कोरोनाची गंभीरता टाळण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे.

लसीकरणानंतर रोग प्रतिकारशक्ती किती काळ टिकते यासाठी विविध स्तरांवर अभ्यास सुरू आहे.

- डॉ. प्रशांत पाटील, औषध वैद्यकशास्त्र विभाग मेडिकल

लसीकरणानंतर संसर्ग होऊन

मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेले रुग्ण

कोव्हॅक्सिन पहिला डोस - ०९ रुग्ण

कोव्हॅक्सिन दुसरा डोस - ०६ रुग्ण

कोविशिल्ड पहिला डोस - ३३ रुग्ण

कोविशिल्ड दुसरा डोस - ०४ रुग्ण

Web Title: Even after vaccination, 52 patients tested positive for corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.