शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:12 AM2021-09-07T04:12:24+5:302021-09-07T04:12:24+5:30
नागपूर : वीज बिलाच्या वाढत्या थकबाकीमुळे चिंतेत असलेल्या महावितरणने थकबाकी वसुली मोहीम सुरु केली आहे. वारंवार विनंती-आवाहन करूनही थकबाकी ...
नागपूर : वीज बिलाच्या वाढत्या थकबाकीमुळे चिंतेत असलेल्या महावितरणने थकबाकी वसुली मोहीम सुरु केली आहे. वारंवार विनंती-आवाहन करूनही थकबाकी न भरणाऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहेत. आतापर्यंत १० हजारांवर कनेक्शन कापण्यात आले आहेत.
दरम्यान, अनेक ठिकाणी शेजाऱ्यांकडून वीज घेण्याचे प्रकारही उघडकीस येत आहेत. अशा लोकांनी सावध होण्याची गरज आहे. कारण शेजाऱ्याकडून वीज कनेक्शन घेणे आणि देणे अवैध आहे. नियमानुसार या प्रकारे वीज कनेक्शन घेणारे व देणारे या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल होऊ शकतो.
महावितरणने स्पष्ट केले आहे की, कोणताही व्यक्ती आपल्या कनेक्शनमधून दुसऱ्याच्या संपत्तीला वीज प्रदान करू शकत नाही. पकडले गेल्यास वीज घेणाऱ्यासह देणाऱ्याविरुद्धही गुन्हा दाखल होऊ शकतो.
बॉक्स
- कायदा काय सांगतो
इलेक्ट्रिसिटी ॲक्टचे कलम १२६ अंतर्गत हा प्रकार अनधिकृत कनेक्शनच्या श्रेणीमध्ये येतो. अशा प्रकरणात दोघांविरुद्ध दंडात्मक कारवाईसह तुरुंगवासाचीही तरतूद आहे. अशा प्रकरणाची माहिती देणाऱ्यांना महावितरणने पुरस्कार देण्याची घोषणाही करून ठेवली आहे.
बॉक्स
पकडल्या गेलेल्या वीज चोरीची प्रकरणे
वर्ष हूक टाकणे मीटरमध्ये गडबडी एकूण प्रकरणे दंडासह रक्कम
२०२१-२२ - ७१० - ८४५- १५५५ - २२६.९२ लाख
बॉक्स
प्रत्येक कनेक्शनवर नजर
सध्याचे वीज मीटर नवीन तंत्रज्ञानयुक्त आहेत. प्रत्येक मीटरवर कंपनीचे बारीक लक्ष असते. मीटरच्या गतीमध्ये बदल होताच कंपनीकडून मीटरची तपासणी केली जाते. वीज चोरी पकडली गेल्यास शिक्षाही होऊ शकते.
दिलीप दोडके, मुख्य अभियंता, महावितरण