लॉकडाऊनमुळे कामगार गावी गेले : परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत कामे ठप्पच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:34 PM2020-05-09T22:34:53+5:302020-05-09T22:39:32+5:30

लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने बांधकामासह काही अन्य क्षेत्रांतील कामे सुरू करण्याची परवानगी दिली. नागपूर शहरातील सिमेंट रोड, रस्ते, उड्डाणपूलासह अन्य कामे सुरू होतील अशी आशा होती. परंतु यासाठी महत्त्वाचा घटक असलेले कामगार गावी गेले आहेत. काही दिवसांनी लॉकडाऊन संपला तरी निर्माण झालेली परिस्थिती बघता कामगार परण्याची शक्यता नाही. त्यामुळे परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत विकासकामे ठप्पच राहणार आहेत.

Even if it is allowed, work will be stopped till Diwali! | लॉकडाऊनमुळे कामगार गावी गेले : परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत कामे ठप्पच!

लॉकडाऊनमुळे कामगार गावी गेले : परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत कामे ठप्पच!

Next
ठळक मुद्देसिमेंट रोडसह विकासकामांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने बांधकामासह काही अन्य क्षेत्रांतील कामे सुरू करण्याची परवानगी दिली. नागपूर शहरातील सिमेंट रोड, रस्ते, उड्डाणपूलासह अन्य कामे सुरू होतील अशी आशा होती. परंतु यासाठी महत्त्वाचा घटक असलेले कामगार गावी गेले आहेत. काही दिवसांनी लॉकडाऊन संपला तरी निर्माण झालेली परिस्थिती बघता कामगार परण्याची शक्यता नाही. त्यामुळे परवानगी असली तरी दिवाळीपर्यंत विकासकामे ठप्पच राहणार आहेत.
महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता मनपा आयुक्तांनी नवीन विकासकामांना ब्रेक लावले होते. सुरू असलेले प्रकल्प, सिमेंट रोडची कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. अर्धवट सिमेंट रोडची कामे पावसाळ्यापूर्वी होतील, अशी अपेक्षा होती. पण लॉकडाऊन सुरू होताच कामे ठप्प पडली. महापालिकेत लहानमोठे २०० कंत्राटदार आहेत. प्रत्येकाकडे सरासरी २० ते २५ कामगार आहेत. म्हणजेच ४ ते ५ हजार कामगार काम करीत होते. यात प्रामुख्याने मध्य प्रदेशातील कामगारांचा समावेश आहे.
तसेच इंजिनिअर, ट्रकचालक, टिप्पर चालक अशा कुशल कामगारांचाही यात समावेश आहे. आधीच बिल वेळेवर मिळत नाही. त्यात अर्धवट कामामुळे कंत्राटदारांना बिल सादर करणे शक्य नाही. पुढे काही महिने बिल मिळण्याची शक्यता नाही. अशा कोंडीत कंत्राटदार सापडले आहेत. होळीसाठी गावी गेलेले कामगार परतले होते. पण लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने व जवळ पैसे नसल्याने कामगार मिळेल त्या साधनाने गावी गेले. मनपा कंत्राटदारांना बिल मिळालेले नाही. अशा परिस्थितीत कामगारांना थांबविण्यासाठी त्यांना देण्यासाठी कंत्राटदारांकडे पैसै नव्हते. त्यामुळे कामगारांना थांबविणे शक्य झाले नाही.

पावसाळ्यापूर्वी सिमेंट रोड पूर्ण होणे अशक्य
लॉकडाऊनमुळे सिमेंट रोडसह प्रकल्पांचे बांधकाम ठप्प आहे. कामगार त्यांच्या गावी गेल्याने इतक्यात ते परतण्याची शक्यता नाही. त्यामुळे सिमेट रोडची अर्धवट कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नाही. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

कामगार नाहीत, सिमेंटचे दरही वाढले
नवीन कामांना मंजुरी नाही. जुनी कामे सुरू होती. त्यात पावसाळ्यानंतर मनपातील कंत्राटदारांना बिल मिळालेले नाही. वेळेवर बिले मिळत नाहीत. लॉकडाऊनमुळे कामगार गावी गेले आहेत. स्थानिक कामगार बांधकाम क्षेत्रात काम करीत नाहीत. कंत्राट घेतला तेव्हा सिमेंटच्या बॅगेची किंमत २४० रुपये होते. आता ३७० रुपये झाली आहे. पुढे पावसाळा सुरू होईल. अशा अडचणीत मनपातील कंत्राटदार सापडले आहेत. प्रशासनाने किमान बिल दिले तर थोडा दिलासा मिळेल.
 विजय नायडू, अध्यक्ष, मनपा कंत्राट संघटना

Web Title: Even if it is allowed, work will be stopped till Diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.