जुन्या वाहनांनाही आता हाय सिक्युरिटी नंबरप्लेटची सक्ती

By सुमेध वाघमार | Updated: December 6, 2024 14:09 IST2024-12-06T14:08:41+5:302024-12-06T14:09:50+5:30

तीन एजन्सीला काम : ३१ मार्च २०२५पर्यंत 'एचएसआरपी' लावणे अनिवार्य

Even old vehicles are now forced to have high security number plates | जुन्या वाहनांनाही आता हाय सिक्युरिटी नंबरप्लेटची सक्ती

Even old vehicles are now forced to have high security number plates

सुमेध वाघमारे 
लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
गुन्हा करण्यासाठी वाहनांचा होणारा वापर रोखण्यासाठी व नंबरप्लेटच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नव्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट' (एचएसआरपी) लागू करण्यात आली. आता जुन्या वाहनांनासुद्धा 'एचएसआरपी'ची सक्ती केली जाणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाने तीन एजन्सीची नियुक्ती केली असून शुल्कही निर्धारित केले आहे.


राज्यात २०१९ पासून नव्या उत्पादित वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट' सक्तीची केली आहे. वाहनाला एकदा ही नंबरप्लेट लावल्यानंतर ती पुन्हा काढता येत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बनविण्यात आलेली ही नंबरप्लेट्स 'टॅम्परप्रूफ' असते. या नंबरप्लेटवर निळ्या रंगाच्या चक्राचे होलोग्राम व वाहन क्रमांकाच्या काळ्या तिरप्या ओळीत 'इंडिया' (इंग्रजीतील शब्द) अक्षरे लिहिलेली असतात. ही नंबरप्लेट अॅल्युमिनिअम मिश्र धातूपासून बनवलेली असते. परिवहन विभागाने ३१ मार्च २०२५ पर्यंत जुन्या वाहनांना 'एचएसआरपी' लावणे अनिवार्य केले आहे. 


डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होणार 
आरटीओ तज्ज्ञानुसार, जुन्या वाहनांना 'एचएसआरपी' बसविण्याचे काम तीन एजन्सीला देण्यात आले आहे. ही एजन्सी त्या-त्या आरटीओ कार्यालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात आपले फ्रेंचायझी सुरू करून वाहनांना नंबरप्लेट लावण्याचे काम करणार आहे. तूर्तास याची सुरुवात झालेली नाही; परंतु डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.


असे असणार शुल्क                 
वाहनाचा प्रकार - ४५० रुपये
दुचाकी व ट्रॅक्टर - ५०० रुपये
तीनचाकी कार व इतर वाहने - शुल्क   ७४५ रुपये


झोन ३ मधील जुन्या वाहनांची जबाबदारी एफटीए एचएसआरपी सोल्युशन्सकडे 
झोन ३ मधील 'एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स प्रा. लि.' या एजन्सीला 'एचएसआरपी' तयार करणे व लावण्याचे काम देण्यात आले. यात 'एमएच ०२, एमएच ४३, एमएच ०७, एमएच १६, एमएच १५, एमएच १७, एमएच १८, एमएच १९, एमएच ५४, एमएच ५२, एमएच १०, एमएच५०, एमएच ४५, एमएच ४२, एमएच २३, एमएच २१, एमएच ४४, एमएच २४, एमएच ५५, एमएच २५, एमएच २२, एमएच ३८, एमएच ३०, एमएच २८, एमएच ५६, एमएच ३६, एमएच ३४ या आरटीओ कोडमधील जुन्या वाहनांचा समावेश असणार आहे.


झोन १ मधील जुन्या वाहनांची जबाबदारी रोस्मर्टा सेफ्टी सिस्टमकडे 
झोन १ मधील जुन्या वाहनांसाठी नंबरप्लेट तयार करणे व लावण्याची जबाबदारी रोस्मर्टासाठी सेफ्टी सिस्टम लिमिटेड या एजन्सीला देण्यात आली. यात 'एमएच ४७, एमच ०४, एमएच ४६, एमएच ०९, एमएच १२, एमएच २६, एमएच २७, एमएच ३७, एमएच २९, एमएच ४९, एमएच ३१, एमएच ५१ या आरटीओ कोडमधील जुन्या वाहनांचा समावेश असेल.


झोन २ मधील जुन्या वाहनांची जबाबदारी रिअल मॅझॉन इंडियाकडे 
झोन २ मध्ये रिअल मॅझॉन इंडिया लि. एजन्सीला 'एचएसआरपी तयार करणे व लावण्याचे काम देण्यात आले. यात एमएच ०१, एमएच ०३, एमएच ८, एमएच ०५, एमएच ०६, एमएच ०८, एमएच ४१, एमएच ३९, एमएच ११, एमएच ५३. एमएच १४, एमएच १३, एमएच २०, एमएच ३२, एमएच ४०, एमएच ३५ या आरटीओ कोडमधील जुन्या वाहनांचा समावेश असणार आहे.


"वाहने चोरी, वाहन अपघात व एखाद्या गुन्ह्याची उकल करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट' महत्त्वाची ठरते. हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करून ही नंबरप्लेट तयार केली जाते. परिवहन विभागाच्या सूचनेनुसार लवकरच सर्व जुन्या वाहनांना त्यांची कागदपत्रे तपासून संबंधित एजन्सीकडून 'एचएसआरपी' लावून मिळणार आहे." 
- विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण

Web Title: Even old vehicles are now forced to have high security number plates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.