पावसाळा आला तरी नागपुरात जागोजागी खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 09:41 PM2018-06-09T21:41:19+5:302018-06-09T21:41:33+5:30

राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. नागपुरातही पावसाने हजेरी लावली आहे. जोराच्या पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊ नही शहरातील रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. कुठे केबलसाठी तर कुठे जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. काही मार्गावर पथदिव्यांच्या खांबासाठी खड्डे खोदलेले आहेत. त्यात पाणी साचले आहे. जोराच्या पावसाला सुरुवात झाल्यास वर्दळीच्या मार्गावर अपघात होण्याचा धोका असूनही महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. आधीच मेट्रो रेल्वे व सिमेंट रोडच्या कामामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात पाईपलाईन व केबल कंपन्यांच्या कामाची भर पडली आहे.

Even rainy season to begin, digging work everywhere in Nagpur | पावसाळा आला तरी नागपुरात जागोजागी खोदकाम

पावसाळा आला तरी नागपुरात जागोजागी खोदकाम

googlenewsNext
ठळक मुद्देखड्डे कधी बुजवणार : अपघात घडल्यास जबाबदार कोण?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. नागपुरातही पावसाने हजेरी लावली आहे. जोराच्या पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊ नही शहरातील रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. कुठे केबलसाठी तर कुठे जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. काही मार्गावर पथदिव्यांच्या खांबासाठी खड्डे खोदलेले आहेत. त्यात पाणी साचले आहे. जोराच्या पावसाला सुरुवात झाल्यास वर्दळीच्या मार्गावर अपघात होण्याचा धोका असूनही महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. आधीच मेट्रो रेल्वे व सिमेंट रोडच्या कामामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात पाईपलाईन व केबल कंपन्यांच्या कामाची भर पडली आहे.
शहरातील काही मार्गावरील पथदिव्यांचे खांब बदलण्याचे काम सुरू आहे, सोबतच केबल टाकण्याचे काम सुरू आहे. केबल टाकल्यानंतर खड्डे बुजवून त्यावर सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात आलेले नाही. मेडिकल चौकातून महालकडे जाणाऱ्या मार्गावर पथदिव्यांच्या खांबासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचले आहे. जोराचा पाऊ स आल्यास या खड्ड्यात पडून अपघात होण्याचा धोका आहे. मोक्षधाम चौकातून मेडिकलकडे जाणाºया जाटतरोडी मार्गावर पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. काही भागात पाण्याची लाईन टाकल्यानंतर खोदकाम बुजवण्यात आले, परंतु रस्ता पूर्ववत केलेला नाही. खोदकामाच्या खड्ड्यात पडून वा चिखलामुळे अपघाताचा धोका आहे.
अशीच परिस्थिती मेडिकल चौक ते तुकडोजी पुतळा चौक मार्गाची आहे. पथदिव्यासाठी खांब उभारण्यात आले, परंतु खोदकाम व्यवस्थित केले नाही. बाजूलाच पावसाळी नाली आहे. खोदकामाच्या मातीमुळे नाली तुंबण्याची शक्यता आहे. धंतोली गार्डनच्या बाजूला खोदकाम करण्यात आले, मात्र काम झाल्यानंतर गेल्या काही दिवसापासून खड्डा तसाच आहे. एसडी हॉस्पिटलच्या बाजूला काही दिवसापूर्वी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले. अजूनही खड्डा बुजवलेला नाही. खड्ड्याच्या भोवताल कठडे लावण्यात आले आहे. जोराच्या पावसात खड्डा बुजल्यास यात पडून अपघाताचा धोका आहे. गे्रट नागरोडच्या बाजूलाही मागील काही दिवसापूर्वी केलेल्या खोदकामाचा खड्डा तसाच आहे. शहराच्या सर्वच भागातील पाईपलाईन, केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. काम झाल्यानंतर खड्डे तातडीने बुजवले जात नसल्याचे चित्र आहे. याकडे महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
मनपाला जाग कधी येणार?
दरवर्षी पावसाला सुरुवात होताच खोदकामाच्या खड्ड्यामुळे अपघात होतात. वाहतुकीची कोंडी होते. असा अनुभव असूनही याची वेळीच दखल घेतली जात नाही. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर बैठका घेतल्या जातात. शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांचा विचार करता महापालिका प्रशासनाला जाग कधी येणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
पावसापूर्वीच रस्त्यावर खड्डे
पावसाला सुरुवात झाली की शहरातील डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून खड्डे दुरुस्तीचा दावा केला जातो. यावर्षी मात्र पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच शहरातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. मात्र संबंधित कं त्राटदारांवर कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही.
चार वर्षांत ५०० रस्त्यांचे डांबरीकरण
रस्त्याचे काम केल्यानंतर दोन वर्षाचा दायित्व कालावधी असतो. त्यानुसार गेल्या चार वर्षात महापालिकेने जवळपास ५०० रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. यातील २०० रस्त्यांचा दायित्व कालावधी संपण्यापूर्वीच अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. अद्याप जोराच्या पावसाला सुरुवात झालेली नाही. सुरुवात होताच पावसामुळे खड्डे पडल्याचे कारण सांगितले जाणार आहे.
कामाच्या ठिकाणी फलक का नाही?
शहरातील रस्ते महापालिका, नासुप्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आदींच्या मालकीचे आहेत. उखडलेल्या रस्त्यामुळे महापालिकेची बदनामी होत असल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर फलक लावण्याची घोषणा दोन वर्षापूर्वी करण्यात आली होती. त्यानुसार यात रस्ता कुणाच्या मालकीचा आहे, रस्त्याचे काम कोणत्या कंत्राटदाराने केले़, त्याला केव्हा काम दिले, दायित्व कालावधी केव्हापर्यंत आहे, कामाची किंमत, कामावर देखरेख ठेवणाऱ्या महापालिकेतील अधिकाऱ्यांचे नाव, आदी बाबींची माहिती दिली जाणार होती, परंतु अद्याप फलक लागलेले नाही.

Web Title: Even rainy season to begin, digging work everywhere in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.