अशीही फेसबुक फ्रेंडशिप : कथित समाजसेविकेच्या कैचीत अनेक जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 10:19 PM2020-06-05T22:19:43+5:302020-06-05T22:21:02+5:30

राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात समाजसेविका म्हणून मोठमोठ्या व्यक्तींच्या बाजूला बसणाऱ्या ठगबाज महिलेचा अखेर बुरखा फाटला. तिच्याविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे संबंधित वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Even so, Facebook friendship: Many people in the so-called social worker's scissors | अशीही फेसबुक फ्रेंडशिप : कथित समाजसेविकेच्या कैचीत अनेक जण

अशीही फेसबुक फ्रेंडशिप : कथित समाजसेविकेच्या कैचीत अनेक जण

Next
ठळक मुद्देपुरुषांसोबतच महिलाही शिकार : अखेर बुरखा फाटला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात समाजसेविका म्हणून मोठमोठ्या व्यक्तींच्या बाजूला बसणाऱ्या ठगबाज महिलेचा अखेर बुरखा फाटला. तिच्याविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे संबंधित वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रीती ज्योतिर्मय दास (वय ३९) असे या कथित समाजसेविका चे नाव असून ती कामठी मार्गावरील प्रियदर्शिनी हाऊसिंग सोसायटीत राहते.
एखाद्या सिनेमातील खलनायिकेप्रमाणे वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका वठविणाऱ्या प्रीतीची व्यक्तींना ठगविण्याची पद्धत अफलातून आहे. ती आधी फेसबुकवरून फ्रेंडशिप करते. नंतर जवळीक साधलेल्या व्यक्तीला आपले नेते, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेले संबंध किती घनिष्ठ आहते ते दाखवण्यासाठी त्यांच्यासोबत काढलेले फोटो दाखवते. त्यानंतर त्या व्यक्तीच्या दुखऱ्या बाबींवर हात ठेवून त्याला ब्लॅकमेल करते. प्रीतीने अशाप्रकारे अनेक महिला, पुरुषांना गंडविले आहे.
तिने काही दिवसांपूर्वी पाचपावलीतील उमेश ऊर्फ गुड्डू देवीशंकर तिवारी (वय ५०) यांच्याशी सलगी साधली होती. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचा वाद सुरू असल्याचे माहीत पडल्याने प्रीतीने त्या वादात उडी घेतली. तिवारी यांच्याशी गोडीगुलाबीने वागून आपण लग्न करून एकत्र राहू, अशी थाप मारली. त्यानंतर सदनिका विकत घेण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून दोन लाख, ६० हजार रुपये घेतले. बरेच दिवस होऊनही तिने सदनिका घेतली नसल्यामुळे तिवारींनी तिला आपले पैसे मागितले. त्यामुळे तिने त्यांना ब्लॅकमेल करणे सुरू केले. त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून आतापर्यंत १४ लाख ८७ हजार ६०० रुपये घेतले. तिच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार देऊनही फायदा होत नाही, असा गैरसमज झाल्यामुळे बरेच दिवस तिवारी यांनी कोंडमारा सहन करून केला. मात्र प्रीतीच्या गोतावळ्यातील काही जणींनी तिच्याविरुद्ध भूमिका घेल्यानंतर एका सामाजिक कार्यकर्तीच्या माध्यमातून तिवारी यांनी वरिष्ठांकडे प्रीतीविरुद्ध तक्रार नोंदविली. वरिष्ठांनी सविस्तर चौकशी केल्यानंतर तिच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पाचपावली पोलिस ठाण्यात कलम ४२० नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठिकठिकाणी गुन्हे
प्रीतीविरुद्ध २०१० मध्ये सीताबर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. २०१६ मध्ये भंडारा येथेदेखील प्रीतीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

प्रीतीच्या पापात अनेकांचा सहभाग
प्रीतीच्या पापात अनेक जण सहभागी असल्याची चर्चा आहे. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे संबंधितांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी कसून चौकशी केल्यास एक मोठे रॅकेट पुढे येऊ शकते.

मांडवलीचे काम
अलीकडे सामाजिक मंचावर समाजसेविका म्हणून वावरणारी प्रीती चक्क मांडवलीचे काम करीत होती. ती वेगवेगळ्या तरुणींनाही आपल्या जाळ्यात ओढायची आणि त्यांचा गैरफायदा घ्यायची. प्रीतीने नोकरीचे आमिष दाखवूनही अनेक तरुण, तरुणींची फसवणूक केल्याची चर्चा आहे.

पोलिसांचे आवाहन
प्रीतीने ज्यांना ब्लॅकमेल केले असेल किंवा ज्यांच्याशी धोकेबाजी, विश्वासघात केला असेल त्या सर्वांनी पोलिस ठाण्यात तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Even so, Facebook friendship: Many people in the so-called social worker's scissors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.