भगदाड बुजवले तरी धाेका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:08 AM2021-07-25T04:08:38+5:302021-07-25T04:08:38+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क पवनी : हिवराबाजार-तुमसर मार्गावरील खरपडा (ता. रामटेक) शिवारातील पुलाला पडलेले भगदाड बुजवण्यात आले. मात्र, या पुलावरील ...

Even though Bhagdad was killed, the flames remained | भगदाड बुजवले तरी धाेका कायम

भगदाड बुजवले तरी धाेका कायम

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

पवनी : हिवराबाजार-तुमसर मार्गावरील खरपडा (ता. रामटेक) शिवारातील पुलाला पडलेले भगदाड बुजवण्यात आले. मात्र, या पुलावरील राेडच्या दाेन्ही बाजू कमकुवत झाल्या असल्याने हा पूल धाेकादायक ठरू शकताे. त्यामुळे या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

पवनी-हिवराबाजार-तुमसर (जिल्हा भंडारा) हा मार्ग कमी अंतराचा असल्याने त्यावर सतत रहदारी असते. या मार्गावर पवनी (ता. रामटेक) पासून दाेन किमीवर असलेल्या खरपडा शिवारात पूल आहे. या पुलाची उंची कमी असल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहात असल्याने रहदारी ठप्प हाेते. पाण्याच्या तेज प्रवाहामुळे या पुलावरील राेडच्या दाेन्ही बाजूची माती व मुरुम वाहून गेल्याने ताे भाग राेडच्या तुलनेत खाेलगट झाला आहे.

वाहनांच्या वजनामुळे या पुलाजवळ राेड दबल्यागत झाला आहे. त्यामुळे या पुलावर खड्डे तयार हाेण्याचे प्रमाणही वाढले. नुकत्याच काेसळलेल्या पावसामुळे या पुलाच्या एका भागाला भगदाड पडले हाेते. ते अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट काॅंक्रीटने बुजवले. या पुलाची वारंवार जुजबी दुरुस्ती केली जात असली तरी खड्डे तयार हाेत असल्याने धाेका कायम आहे. त्यामुळे या ठिकाणी उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

...

डांबरी राेड आणि सिमेंट काॅंक्रीट

हा राेड डांबरी आहे. पुलाला पडलेले भगदाड बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंट काॅंक्रीटचा वापर केला आहे. हा मार्ग माेगरकसा या पर्यटनस्थळाकडे जात असल्याने पर्यटकांचीही सतत वर्दळ असते. खड्ड्यातील सिमेंट काॅंक्रीट माती व डांबरामुळे फार काळ टिकत नाही. हे भगदाड मुरुम, गिट्टी व डांबर टाकून बुजवायला हवे हाेते, अशी माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

Web Title: Even though Bhagdad was killed, the flames remained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.