... गणरायालाही जेव्हा वाजू लागते थंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 10:06 AM2018-12-19T10:06:16+5:302018-12-19T10:07:53+5:30
उपराजधानी सध्या थंडीने गारठली आहे. ढगाळ वातावरणामुळे गारवा वाढलाय. जसे भक्त थंडीने कुडकुडत आहेत, नागपुरातील गणेशभक्तांचे दैवत असलेल्या टेकडी गणेशालाही थंडी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: उपराजधानी सध्या थंडीने गारठली आहे. ढगाळ वातावरणामुळे गारवा वाढलाय. प्रचंड थंडीमुळे ऊबदार कपड्याशिवाय कुणी बाहेरच निघत नाही. जानेवारीत तर थंडीचा जोर अजून वाढेल अशी शक्यता आहे. जसे भक्त थंडीने कुडकुडत आहेत, नागपुरातील गणेशभक्तांचे दैवत असलेल्या टेकडी गणेशालाही थंडी लागत आहे. देवाला थंडी लागू नये म्हणून भक्तांनी टेकडी गणेशाला ऊबदार शाल पांघरली आहे. नागपूर गणेश टेकडी हे देवस्थान अतिशय प्रसिद्ध असून हा गणपती नवसाला पावतो असा भक्तांचा विश्वास आहे. नागपुरात जेव्हा क्रिकेट मॅच असायची व तीत सचिन तेंडुलकर खेळणार असायचा तेव्हा तो टेकडी गणेशाला वंदन करण्यासाठी आवर्जून भेट देत असे.