अखेर त्यांनी थाटली भाज्यांची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 10:09 PM2020-05-13T22:09:31+5:302020-05-13T22:11:39+5:30

कोरोना विषाणूच्या संक्रमणाने अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेरोजगार झालेल्या लोकांनी शहरात रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत.

Eventually they found vegetable shops | अखेर त्यांनी थाटली भाज्यांची दुकाने

अखेर त्यांनी थाटली भाज्यांची दुकाने

Next
ठळक मुद्देभाजीविक्रेत्यांची पूर्वीपेक्षा दुप्पट गर्दी : कोरोना नियमांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या संक्रमणाने अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. बेरोजगार झालेल्या लोकांनी शहरात रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली आहेत. संबंधित विभागाकडून कोणतीही परवानगी न घेता सुरू झालेल्या या दुकानांवर प्रशासनाच्या सूचनांचे पालन होत नसल्याने कोरोनाचा धोका आणखीच वाढला आहे.
पूर्वीच्या तुलनेत अशी दुकाने दुप्पट झाली आहेत. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी बेरोजगारांनी ही पावले उचलली असली तरी संकटकाळात त्यांच्यावर शासनाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी पुढे आली आहे.
मनपा आयुक्तांनी मुख्य बाजार बंद करून शहराच्या विविध भागात सुरू केलेले भाजीबाजार आता बंद झाले आहेत. त्या बाजारातील विक्रेत्यांनी खुल्या जागेवर भाजी आणि फळांची दुकाने थाटली आहे. नंदनवन, जगनाडे चौक, महाल, झेंडा चौक, सक्करदरा, दिघोरी या भागात मोकळ्या जागेवर दुकाने सुरू आहेत. एवढेच नव्हे तर त्यातील अनेकजण पहिल्यांदाच भाजी विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. सदर प्रतिनिधीने या सर्व दुकानांची पाहणी केली असता या सर्व दुकानदारांनी प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. पण या दुकानांवर सॅनिटायझरची व्यवस्था दिसून आली.
सक्करदरा परिसरातील सोमवारी क्वॉर्टर येथील बाजार बंद केल्यानंतरही भाजीविक्रेत्यांनी क्रीडा चौकात दुकाने सुरू केली आहेत. नंदनवन मार्गावरही अनेकांनी दुकाने लावली आहेत. अनेकजण कळमन्यात भाज्यांची विक्री न करता नंदनवन मार्गावर गाड्या लावून भाज्यांची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. तिरंगा चौक, गुरुदेवनगर, नंदनवन ते हसनबाग मार्ग, उमरेड रोड, दिघोरी, मोठा ताजबाग, म्हाळगीनगर, हुडकेश्वर, मानेवाडा, बेसा, नरेंद्रनगर, खामला, जयताळा, हिंगणा रोड या परिसरातील प्रमुख मार्गांवर भाजी विक्रेत्यांची गर्दी वाढली आहे.

तर वाढू शकतात रुग्ण!
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारचा प्रयत्न आहे. मात्र असे विक्रेते नियमांचे उल्लंघन करून प्रशासनाच्या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. या विक्रेत्यांकडे नागरिक मास्क न लावता खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांच्या अशा निष्काळजीपणामुळे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढत आहे. याकरिता प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे काही नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Eventually they found vegetable shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.