महाकाळकर पायउतार

By admin | Published: May 20, 2017 02:46 AM2017-05-20T02:46:36+5:302017-05-20T02:46:36+5:30

शहर काँग्रेसमधील यादवीला शुक्रवारी पूर्णविराम देत विभागीय आयुक्तांनी १६ सदस्यांचे पाठबळ असलेल्या तानाजी वनवे यांची

Evergreen footprint | महाकाळकर पायउतार

महाकाळकर पायउतार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर काँग्रेसमधील यादवीला शुक्रवारी पूर्णविराम देत विभागीय आयुक्तांनी १६ सदस्यांचे पाठबळ असलेल्या तानाजी वनवे यांची नागपूर महापालिकेतील काँग्रेसच्या सदस्यांनी गटनेतेपदी केलेली निवड योग्य ठरविली आहे. या निर्णयामुळे विद्यमान विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर पायउतार झाले आहेत. राजकीयदृष्ट्या विचार करता आयुक्तांच्या या निर्णयामुळे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार गटाला मात्र जबर धक्का बसला आहे. विरोधी पक्षनेते आणि स्वीकृत सदस्याच्या मुद्यावर मुत्तेमवार गटाची कोंडी करण्यासाठी माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊ त व अनिस अहमद एकत्र आले होते. या राजकीय कलगितुऱ्यात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांची महापालिकेच्या स्वीकृ त सदस्यपदी होणारी अडचणीत आली आहे. ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज तूर्त वैध असला तरी या संदर्भात विभागीय आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

सभागृहात फक्त नोंद केली जाणार
गटनेता निवडीचा अधिकार सभागृहाला नाही. विभागीय आयुक्तांना हा अधिकार आहे. तसेच गटनेत्यांच्या शिफारशीनुसार स्वीकृत सदस्यांची निवड विभागीय आयुक्तांकडून केली जाते. याबाबत घेण्यात येणाऱ्या निर्णयाची नोंद महापालिका सभागृहात घेतली जाते. त्यानुसार आयुक्तांच्या निर्णयाची सभागृहात नोंद केली जाणार आहे.

स्वीकृत सदस्याबाबत सभागृहात निर्णय
स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू आहे. स्वीकृत सदस्याची निवड गटनेत्यांच्या शिफारशीने केली जाते. मात्र विभागीय आयुक्तांच्या निर्णयापूर्वी असलेला गटनेता यांची शिफारस विचारात घ्यायची की निर्णयानंतर झालेल्या गटनेत्यांची शिफारस विचारात घ्यायची, याबाबतचा निर्णय सभागृहात घेतला जाईल.
अश्विन मुदगल,
आयुक्त, महापालिका

पक्षविरोधी कारवायाची तक्रार
पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची तक्रार प्रदेश काँग्रेस कमिटीकडे केली आहे. पक्षाला विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात निर्णय होईल. या प्रकरणात संजय महाकाळकर उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती आहे.
विकास ठाकरे,
अध्यक्ष ,शहर काँग्रेस

उच्च न्यायालयात जाणार
काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष यांनी पत्र दिल्यानंतर व सर्व सदस्यांच्या संमतीनंतर विभागीय आयुक्तांनी माझी गटनेतेपदी निवड केली होती. परंतु नवीन गटनेता निवडण्यासाठी पक्षाने पत्र दिलेले नाही. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे.
संजय महाकाळकर, माजी विरोधीपक्षनेते, महापालिका

Web Title: Evergreen footprint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.