दिवसाढवळ्या घरात घुसून लुटले
By admin | Published: August 25, 2015 03:32 AM2015-08-25T03:32:51+5:302015-08-25T03:32:51+5:30
हुडकेश्वर परिसरात सोमवारी दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसून चाकूच्या धाकावर लुटमार केली.
नागपूर : हुडकेश्वर परिसरात सोमवारी दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी एका घरात घुसून चाकूच्या धाकावर लुटमार केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज गृह समस्या निवारण संस्था, ले-आऊट, बेलतरोडी येथील मोतीराम विस्तारी बागडे (वय ६७ वर्षे) हे आपल्या कुटुंबासह घरी हजर असताना दुपारी १ वाजताच्या सुमारास २५ ते ४५ वयोगटातील चार अनोळखी आरोपींनी त्यांचे घराचे मागील दार तोडून आत प्रवेश केला. यानंतर चाकूच्या धाकावर लुटमार सुरू केली. दरम्यान, मोतीराम बागडे यांच्या पत्नी उषा (वय ५४ वर्षे) यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व आलमारीतील रोख १० हजार रुपये, असा एकूण १ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला. यानंतर फिर्यादी, त्यांच्या पत्नी व दोन मुलींना बेडरू ममध्ये बंद करू न सर्व आरोपी पळून गेले. याप्रकरणी फिर्यादी मोतीराम बागडे यांनी दिलेल्या तक्रारीवरू न आरोपींविरुद्ध कलम ३९२ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दुसऱ्या एका घटनेत गांधीबाग परिसरात अज्ञात आरोपीने एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळविली. संतोषदेवी राजेंद्रप्रसाद साबू (वय ६० वर्षे) रा. साबू सदर, सिद्धी धर्मशाळेच्या बाजूला गांधीबाग, असे त्या महिलेचे नाव आहे. त्या सोमवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मंदिरात पायदळ जात असताना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सचदेव इंटरप्राईजेस दुकानासमोर अंदाजे ३० वयोगटातील एका अनोळखी आरोपीने साबू यांच्या गळ्यातील सुमारे २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी आरोपीविरूद्ध ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)